बिबट्यांची तस्करी उघड

Leopard
Leopard

खेड शिवापूर - पुणे-सातारा महामार्गावरील येथील टोल नाक्‍यावर सोमवारी (ता. २०) बिबट्याच्या बछड्यांची तस्करी करणाऱ्या तीन जणांना राजगड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तीन ते चार महिने वयाचे बिबट्याचे दोन बछडे ताब्यात घेण्यात आले. त्यांना कात्रज (पुणे) येथील वन्यजीव अनाथालयाकडे सुपूर्त करण्यात आले आहे. मुन्ना हबीब सय्यद (वय ३१, रा. शिरूर), इरफास मेहमूद शेख (वय ३२, रा. कोंढवा बुद्रुक, पुणे) आणि गाडीचा चालक आयास बक्‍शुलखान पठाण (वय ४०, रा, घोरपडी पेठ, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, ते  बछडे बंगळूरवरून आणून, परदेशात विकण्याच्या उद्देशाने तस्करी करण्यात येत होती, असे तपासात उघड झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com