अंधाऱ्या रात्री तो आला...फार्महाउस...अन्...

leo.jpg
leo.jpg

टाकवे बुद्रुक : चार दिवसांपूर्वी आंदर मावळातील डाहुली परिसरातील एका फार्महाउसवरील कुत्रा जबड्यात पकडून नेतानाचा बिबट्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. त्यामुळे डाहुली परिसरात पुन्हा बिबट्याची दहशत वाढू लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

गेल्या दीड महिन्यांपूर्वी डाहुली गावाशेजारील ओढ्यावर सलग तीन दिवस बिबट्या पाणी पिण्यासाठी येत होता व बिबट्या नागरिकांना पाहावयासही मिळाला होता. त्यावेळी डाहुली गावातील एका कुत्र्यावर हल्ला केल्याने त्यात तो कुत्रा पूर्णपणे जखमी झाला होता.

डाहुली परिसरात एका पुण्यातील डॉक्टरांचे फार्महाऊस आहे. तेथे फार्महाउसची राखण करण्यासाठी एक पाळीव कुत्रा आहे. काही दिवस डॉक्टर तेथे नव्हते. डॉक्टर चार दिवसानंतर फार्महाउस वर आल्यानंतर त्यांना त्यांचा कुत्रा दिसेनासा झाला म्हणून त्यांनी सिसीटीव्ही कॅमेरे चेक केले. आणि त्यात त्यांना त्यांचा कुत्रा एक बिबट्या जबड्यात ओढून नेतानाचा आढळला आहे. या घटनेची चर्चा डाहुली व डाहुलीच्या आजूबाजूच्या गावात होत आहे.

डाहुली गावात पुन्हा बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिक दिवसा-रात्री घराबाहेर फिरण्यास घाबरू लागली आहेत. तसेच आजूबाजूच्या बेंदेवाडी, बोरिवली, कांब्रे गावात नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. यामुळे तातडीने वनविभागाने या बिबट्याला पकडावे अशी मागणी नागरिक करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com