नांदूर परिसरात रात्रंदिवस धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद 

नांदूर परिसरात रात्रंदिवस धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद 

राहू : नांदूर, खामगाव, सहजपूर (ता. दौंड) येथील परिसरात रात्रंदिवस धुमाकूळ घालून अनेक पाळीव प्राण्यांचा फडशा पाडणा-या बिबटयाला गुरूवार (ता. २९) दोन वाजण्याच्या सुमारास नांदूर नजीक कोतीमाळ येथे पिंज-यात जेरबंद करण्यात आले.

सदर बिबटयाला पुणे (कात्रज) येथे प्राथमिक उपाचार केल्यानंतर जुन्नर येथील माणिकडोह निवारण केंद्रात दाखल करण्यात येणार आहे. अशी माहिती दौंड तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रघतवान यांनी दिली.

या परिसरात गेल्या तीन वर्षांपासून बिबट्या तसेच मादीने धूमाकुळ घातला होता. साधारणता चार वर्षाच्या बिबटयाला जेरबंद केले . बिबटयाने परिसरातील अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडला होता. परिसरात गेल्या तीन ते चार वर्षांपासून बिबटया, मादी व बछाडयांचा अधिक वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिसरात उर्वरित बिबटया, मादी, बछड्यांच्या हालचाली पाहून त्यांनाही लवकरात लवकर पिंज-यात जेरबंद करू. मात्र नागरिकांनी देखील रात्रीच्या वेळेला सतर्क (जागृत) राहून वनविभागाला वेळोवेळी सहकार्य करावे. असे आवाहन वनविभागाने केले.

बिबटयाला जेरबंद करण्यासाठी वनपाल गणेश पवार, नानासाहेब चव्हाण, वनरक्षक सचिन पुरी, दिपाली पिसाळ, शिवकुमार बोंभले, सुनीता क्षिरसाठ, दिलीप कुदळे यांच्या पथकांसह सरपंच लता थोरात, विशाल थोरात, अप्पा घुले, विजय बोराटे, दत्ता बोराटे, यशवंत थोरात आदींचे सहकार्य लाभले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'सकाळ' च्या वुत्ताचे कौतुक- नांदूर परिसरात बिबटया, मादी, बछाड्यांचा अनेक वर्षांपासून वावर आहे. या प्राण्यांनी अनेक पाळीव प्राण्यांना फस्तही केले आहेत. काही ग्रामस्थांवर अनेकदा त्याने गुरकून अडवण्याचा प्रयत्नही केला होता. बिबट्याचे हल्ल्याच्या प्रत्येक घटनेचे 'सकाळ' मध्ये सडेतोड वृ-तांकन आल्याने वनविभागाचे अधिकारी चांगलेच वठणीवर आले. 'सकाळ'मधील वृत्तांकनामुळे वनविभागाला देखील सतर्क राहण्यास भाग पाडले. दैनिक 'सकाळ' च्या कामगिरीविषयी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केल्याचे सरपंच लता थोरात, विशाल थोरात यांनी सांगितले.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com