Pune : जंगले नष्ट झाल्याने बिबट्या मानवी वस्तीत येतो आहे का?

नागरिकांनी जागरूक राहावे ः तस्करी करणाऱ्याच्या तावडीतून सुटका करून घेतोय
Leopard
Leopardsakal

उंड्री : अलीकडच्या काळात मानवाने वन्यप्राण्यांच्या हद्दीत अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सहाजिकच वन्यप्राणीही शहरात दिसू लागले आहेत. त्यातून घडणाऱ्या घटनांमुळे मन सुन्न होत आहे. मूळात एक प्रश्न मात्र, अनुत्तरीत राहतो तो म्हणजे मानवी वस्तीत बिबट्या का येत आहे, याचाही विचार होणे गरजेचे आहे. आंतराष्ट्रीय बाजारामध्ये बिबट्यांच्या मिशांना आणि कातड्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे बिबट्याची तस्करी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. काही भागांमध्ये बिबट्याची तस्करी करताना अचानकपणे बिबट्याने चोरट्या तावडीतून सुटून शहरातील मध्यवस्तीत आढळून आल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

मागिल आठवड्यात बिबट्याने हडपसर-साडेसतरानळीमधील नागरिकावर भल्या पहाटे हल्ला केला, त्यानंतर बिबट्याला वनविभागाच्या रेस्क्यूने पडक्या घरात रात्री उशिरा पकडले. मागिल दोन-अडीच वर्षापूर्वी केशवनगरमध्ये बिबट्याला पकडले होते. त्यामुळे आला आहे हे निश्चित असून, बिबट्या मानवीवस्तीत येणे याचाही आता शोध घेण्याची वेळ आली आहे. नेटकऱ्यांनी व्हीडिओ एडिटिंग करून याच भागात बिबट्याचे दर्शन झाल्याचे दाखवून नागरिकांत एकप्रकारे भीती निर्माण केली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही मागिल आठवड्यात केले आहे.

"कोणताही प्राणी हल्ला केल्याशिवाय प्रतिहल्ला करत नाही. वन्यप्राण्यांचे हक्क मानवाने हिरावून घेत जंगलतोड केली, तेथे काँक्रिटची घरे झाली. बिबट्याचे अन्न नाहीशी झाले, पिण्यासाठी पाणी नाही, अशी अवस्था निर्माण झाल्यानेच बिबट्या मानवी वस्तीमध्ये आला आहे. त्यासाठी मानवाने निसर्गाचे संवर्धन करून वन्य प्राण्यांनाही त्यांची हक्काची जागा दिली पाहिजे."

-प्राचार्या उज्ज्वला सावंत, हडपसर

"महंमदवाडी, उंड्री, पिसोळी गावच्या हद्दीलगत जंगल आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांबरोबर बिबट्या येत असावा असा कयास काही मंडळी करू लागली आहेत. बिबट्या नेमका कोणी पाहिला याचे उत्तर अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, सोशल मीडियावर व्हीडिओ क्लीप एडिटिंग करून ती याच भागातील आहे, असे दाखविण्याचा नेटकरी प्रयत्न करू लागले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक संभ्रमात पडला आहे."

-धनंजय हांडे, हांडेवाडी

Leopard
SBIचे माजी चेअरमन प्रतीप चौधरी यांना कर्ज घोटाळा प्रकरणी अटक

"जंगले नष्ट झाली आणि बिबट्या अन्न-पाण्याच्या शोधात आता मानवीवस्तीमध्ये येऊ लागला आहे.मागिल काही आठवड्यात बिबट्याने महंमदवाडी-वाडकर मळा येथे गायीच्या वासराचा फडशा पाडला अशी आवई आली, त्यानंतर साडेसतरनळी येथे तरुणावर हल्ला केला. त्यामुळे नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर बिबट्याला चांगलेच प्रसिद्धी झोतात आणले. त्यामध्ये अनेकांनी फुकटात प्रसिद्धी मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याच्या चर्चेला उधाण आले आहे."

- ज्ञानेश्वर कांबळे, उंड्री-महंमदवाडी

"बिबट्याला नरभक्षक आहे असे बोलले जात असले तरी, त्याला मानव जबाबदार आहे. जंगल आणि वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर झाली, तेथे काँक्रिटची जंगले निर्माण झाली आणि त्याचे जीवन हिरावून घेतले. त्यांचा जगण्याचा अधिकार हिरावून घेतल्याने बिबट्या नागरी वस्तीमध्ये येण्याचे प्रकार अलीकडे दिसू लागले आहेत."

- हरिष शंकर काशिकर, उंड्री

"महंमदवाडीमध्ये मागिल पंधरा दिवसांपूर्वी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलेला प्राणी बिबट्यासदृश आहे. त्यामुळे नागरिकांनी समाज माध्यमावर बिबट्याविषयी चुकीची माहिती पसरवू नये. नागरिकांनी सावधानता बाळगणे सर्वांच्याच हिताचे आहे."

-मुकेश जयसिंग सणस, वनपरिक्षेत्र अधिकारी, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com