पोलिसांची ‘संगीतखुर्ची’

संदीप घिसे
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाचा नियंत्रण कक्ष पिंपरी पोलिस ठाण्याच्या आवारात सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास ७५ आहे. मात्र, त्यांना बसण्यासाठी केवळ १५ खुर्च्या उपलब्ध आहेत. त्यामुळे एक खुर्ची रिकामी झाली की त्यावर दुसऱ्याचा ‘डोळा’ असतो. संगीतखुर्चीचा हा खेळ आठवडाभरापासून सुरू आहे.

कोणताही नवीन अधिकारी किंवा कर्मचारी पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयात बदलून आला की त्याला सर्वप्रथम नियंत्रण कक्षात हजेरी लावावी लागते. त्यानंतर कोणत्या पोलिस ठाण्यात जागा उपलब्ध आहे याची माहिती घेऊन नियुक्‍ती केली जाते. सध्या पोलिस नियंत्रण कक्षात तीन पोलिस निरीक्षक, दोन सहायक निरीक्षक, १५ उपनिरीक्षक आणि ५५ कर्मचारी आहेत. मात्र, येथील नियंत्रण कक्षात केवळ १५ जणांचीच बसण्याची सोय असल्याने इतर कर्मचाऱ्यांना ताटकळत उभे राहावे लागते. एखादा कर्मचारी खुर्चीवरून उठल्यास त्यांची जागा लगेच दुसरा कर्मचारी घेतो.

काही पोलिस अधिकारी व कर्मचारी चारचाकी वाहनाने येथे येतात. बसण्यासाठी जागा नसल्यास या वाहनांचा आसरा घ्यावा लागत आहे. नियंत्रण कक्षाच्या आवारातही पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. दुचाकीवरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गाड्या चिखलातून घसरतात. चिखलातून मार्ग काढतच कर्मचाऱ्यांना नियंत्रण कक्षात यावे लागते. तसेच, सायंकाळनंतर डासांचाही त्रास जाणवत असल्याचे येथील कर्मचारी सांगत आहेत.

पोलिस नियंत्रण कक्षात आलेल्या कर्मचाऱ्यांना आवश्‍यकतेनुसार पोलिस ठाण्यांमध्ये पाठविले जाते. उर्वरित कर्मचारी पोलिस नियंत्रण कक्षात बसतात. यामुळे फार मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची गैरसोय होते असे नाही.
- सतीश पाटील, सहायक आयुक्त

Web Title: Less Chairs in pimpri chinchwad police station