खडकवासला प्रकल्पात निम्म्याहूनही कमी पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जुलै 2019

पुणे : खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस ओसरला असून, जुलैच्या मध्यावधीस यंदा प्रकल्पात निम्म्याहूनही कमी 13.67 अब्ज घनफुट (टीएमसी) पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा पावणेदोन टीएमसीने कमी आहे.

पुणे : खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस ओसरला असून, जुलैच्या मध्यावधीस यंदा प्रकल्पात निम्म्याहूनही कमी 13.67 अब्ज घनफुट (टीएमसी) पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा पावणेदोन टीएमसीने कमी आहे.

खडकवासला प्रकल्पाच्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार
धरणांतून पुण्याला पाणीपुरवठा केला जातो. यासोबतच ग्रामीण भागातील सिंचनासाठीही पाणी दिले जाते. यावर्षी जून महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. जुलै महिन्यात काही दिवस पावसाने चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार हजेरी लावली. त्यामुळे या चार धरणांतील पाणीसाठा 13.67 टीएमसीपर्यंत पोचला. परंतु पुन्हा पावसाने ओढ दिल्यामुळे पाणीसाठा तुलनेत
कमी झाला आहे.

यंदा खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर मुठा नदीतून पाणी सोडण्यात आले. या धरण क्षेत्रात पाऊस नसल्यामुळे मुठा नदीतील विसर्ग थांबविण्यात आला आहे. मात्र, मुठा उजवा कालव्यात एक हजार क्‍युसेकने पाणी सोडले जात आहे, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.
 

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा (ता. 14 जुलै, सायंकाळी पाचपर्यंत)

धरण क्षमता पाणीसाठा टक्‍केवारी पाऊस (मिलिमीटर) (टीएमसी) (टीएमसी)
टेमघर                           3.71                0.90        24.36           05
वरसगाव                      12.82                5.23        40.79           02
पानशेत                        10.65               5.58        52.37           02
खडकवासला                   1.97               1.96         99.16          00

एकूण क्षमता 29.15
 एकूण पाणीसाठा : 13.67 (46.88 टक्‍के)
गतवर्षीचा साठा : 15.48 (53.10 टक्‍के)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Less water in Khadakwasla project