शिवमच्या शिबीरामध्ये मुलांनी गिरविले संस्काराचे धडे

प्रा. प्रशांत चवरे 
मंगळवार, 8 मे 2018

भिगवण - सुट्टी असुनही सकाळी पाच वाजता उठणारी मुले, योगासणे, प्राणायाम, संस्कार गीते, स्वतःचा नाष्टा व दुध स्वतःच घेऊन त्यानंतर संस्कार रांगोळी, वारली पेंटींग, पथनाट्य, प्रेरणादायी लघुपट पाहणे व त्यावर चर्चा असे संस्कारमय वातावरण भिगवण व परिसरातील 150 मुलांनी अनुभवले. स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये पाच दिवसीय निवासी बालसंस्कार शिबीर नुकतेच संपन्न झाले.

भिगवण - सुट्टी असुनही सकाळी पाच वाजता उठणारी मुले, योगासणे, प्राणायाम, संस्कार गीते, स्वतःचा नाष्टा व दुध स्वतःच घेऊन त्यानंतर संस्कार रांगोळी, वारली पेंटींग, पथनाट्य, प्रेरणादायी लघुपट पाहणे व त्यावर चर्चा असे संस्कारमय वातावरण भिगवण व परिसरातील 150 मुलांनी अनुभवले. स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये पाच दिवसीय निवासी बालसंस्कार शिबीर नुकतेच संपन्न झाले.

स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये घारेवाडी(ता.कराड,जि. सातारा) येथील शिवम आध्यत्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठानच्या वतीने पाच दिवसीय निवासी बालसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. समारोप शिवमचे संस्थापक व कोल्हापुर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आला. 

शिवम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शंतनू कुलकर्णी, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, पंचायत समितीचे सदस्य संजय देहाडे, भिगवण रोटरी क्लबचे संस्थापक सचिन बोगावत, संजय चौधरी, महेश शेंडगे यावेळी उपस्थित होते. 

आई-बाबा व बालसंस्कार या विषयावर बोलताना इंद्रजीत देशमुख म्हणाले, अलीकडे घरातील आई बाबा म्हणजे केवळ पैसे पुरविणारे ए.टी.एम. मशीन झाले आहे. पंरतु केवळ पैसे पुरविले म्हणजे आपली जबाबदारी संपते ही भुमिका खऱ्या अर्थाने धोकादायक आहे. घर हे संस्काराचे केंद्र आहे म्हणुन किमान सोळा वर्षापर्यंत मुले जवळ असली पाहिजे. मुलांना शिकविण्यापेक्षा आई वडिलांच्या वागण्या बोलण्यातुन मुले खुप शिकतात त्यामुळे आई वडील संस्कारक्षम असतील तर मुलांवरही तेच संस्कार होतील. संस्कारक्षम मुले घडविण्यामध्ये पालकांची भुमिका महत्वाची आहे. 

वासुदेव काळे, प्रा. रामदास झोळ, दिपाली भोंगळे, शरद काळे, अनुश्री थोरात, मुक्ता जाधव, वैभवी नाळे, स्वस्ती दोशी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अशोक सस्ते यांनी केले. सुत्रसंचालन संगिता खाडे यांनी तर आभार नितीन साखरे यांनी मानले.

शिबीरामध्ये प्रा. सुहास महाजनी, प्रा. अजय दरेकर, प्रा. राजेंद्र साळुंखे, प्रा. मधुकर कोथमिरे यांची व्याख्याने झाली. वरली पेंटीग, शिवार फेरी, सर्प मित्रांशी चर्चा, पथनाट्य, भावगीते अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून मुलांच्या व्यक्तीमत्वास पैलु पाडण्यचा प्रयत्न करण्यात आला. मातृपितृ पुजनाने उपक्रमाची सांगता करण्यात आली. शिबीराचे संयोजन डॉ. जयप्रकाश खरड, प्रा. माया झोळ, डॉ. पद्मा खरड, दिपक वाघ, सुहास प्रभावळे, शितल शिंदे, स्वामी भिसे यांनी केले.

Web Title: Lessons learned by children in camps