नर्मदेच्या पाण्याने मला अखेरची अंघोळ घाला- आत्महत्यापूर्वी लिहिली चिठ्ठी

संदीप घिसे 
सोमवार, 21 मे 2018

पिंपरी - नर्मदेच्या पाण्याने मला अखेरची अंघोळ घाला आणि मंडलेश्वर येथील तिरावर माझ्यावर अंत्यसंस्कार करा, अशी चिठ्ठी लिहित एका तरुणाने आत्महत्या केली. ही घटना चिंचडगाव येथे सोमवारी सकाळी घडली. जतीन धनंजय जहागीरदार (वय ३४, रा. राम मंदिराजवळ चिंचवडगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

सोमवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास त्याने टेरेसवरील कठड्याला दोरी बांधून इमारतीच्या बाहेर उडी मारली. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. ही बाब लक्षात येताच नागरिकांनी पोलिसांना कळविले. इमारतीच्या बाहेर लटकलेला मृतदेह काढण्यासाठी पोलिसांनी अग्निशामक दलास पाचारण केले.

मयत जतीन यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये त्याने आपल्या आत्महत्येस कोणाला जबाबदार धरू नये. तसेच नर्मदेच्या पाण्याने अखेरची आंघोळ घालावी. याच नदीच्या तीरावर असलेल्या मंडलेश्वर येथे अंत्यसंस्कार करावे, अशी अखेरची इच्छा त्याने लिहिली आहे. 

आपल्या आई वडिलांचा प्रेमविवाह झाला आहे. भाऊ वहिनी पुतण्या आणि आई वडील यांनी एकमेकांची काळजी घ्यावी. तसेच माझ्या दुचाकीमध्ये माझा जीव असल्याने ती विकू नका. अशी विनंतीही जतीन यांनी आपल्या पत्रात केली आहे.

Web Title: Let me last the bath with the water of Narmada - The note written before the suicide