सर्वाधिक सुरक्षित शहराच्या मानांकनासाठी प्रयत्न करूया 

सर्वाधिक सुरक्षित शहराच्या मानांकनासाठी प्रयत्न करूया 

पुणे -  ""अमेरिका, इंग्लंड यांसारख्या देशांमध्ये सुरक्षिततेबाबत काय सुरू आहे, याचा अभ्यास करायला हवा. आपणही प्रदर्शने, स्मार्ट सिटी, पीएमपीएमएलच्या माध्यमातून सुरक्षिततेबाबत जनजागृती करू शकतो. पुण्याला राहण्याकरिता उत्तम असे सर्वाधिक पसंतीचे शहर म्हणून मानांकन मिळाले आहे. आता सर्वाधिक सुरक्षित पुण्याच्या मानांकनासाठी प्रयत्न करुया,'' असे आवाहन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी नागरिक व सामाजिक संस्थांना केले. 

नॅशनल सेफ्टी ऑर्गनायझेशनतर्फे 48 व्या राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त व्यावसायिक गुणवत्ता सुरक्षा पुरस्कारांचे वितरण झाले. या वेळी अध्यक्ष एन. डी. पोतनीस, सचिव एस. जी. क्षीरसागर, प्राचार्य एस. टी. काळे, एम. डी. गांगल आदी उपस्थित होते. हेमंत ढवळे यांना व्यावसायिक गुणवत्ता सुरक्षा पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच, विद्यार्थी पुरस्कार धनंजय कोल्हे आणि नीलेश कदम यांना प्रदान करण्यात आले. उपस्थितांकडून सुरक्षेबाबत शपथ घेण्यात आली. 

मुक्ता टिळक म्हणाल्या, ""रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, याकरिता आम्ही काम करीत आहोत. त्यासाठी सुरक्षिततेसाठी काम करणाऱ्या संस्थांनी आमच्यासोबत जनजागृतीसाठी पुढे यावे. यातून शासकीय, निमशासकीय आणि खासगी क्षेत्रामध्ये देखील सुरक्षिततेबाबत जनजागृती होऊ शकेल.'' 

एन. डी. पोतनीस म्हणाले, ""कारखाने आणि समाजामध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढविणे गरजेचे आहे.'' 

एस. टी. काळे म्हणाले, ""भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली नॅशनल सेफ्टी कौन्सिलची स्थापना झाली. सुरक्षिततेची जाणीव निर्माण करण्यासाठी आवश्‍यक त्या गोष्टी या माध्यमातून सुरू झाल्या.'' 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com