जुन्नरच्या प्रस्तावित आयटीआयच्या पदनिर्मितीसाठी वित्तमंत्र्यांचे पत्र 

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 13 जुलै 2018

जुन्नर : भोरवाडी ता.जुन्नर येथील प्रस्तावित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पदनिर्मिती करण्यात यावी यासाठी वित्त मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना लेखी पत्र दिले आहे, अशी माहिती जुन्नर शहर भाजपचे अध्यक्ष नरेंद्र तांबोळी यांनी दिली. 

राज्याचे अर्थ नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार व कौशल्य विकास व कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर जुन्नर तालुक्यातील नारायणगाव-भोरवाडी येथील प्रस्तावित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा गेली अनेक वर्षे प्रलंबित असणारा प्रश्न मार्गी लागला आहे. केवळ पदनिर्मिती झाली नसल्याने तालुक्यातील मंजुर असलेले आयटीआय सुरू होऊ शकले नाही यामुळे तांबोळी यांनी मंत्री महोदयांची समक्ष भेट घेऊन त्यांना ही अडचण सोडविण्यासाठी निवेदन दिले होते. यानंतर त्यांनी पदनिर्मिती साठी पत्र देऊन लवकरच हा प्रकल्प सुरू होईल असे आश्वासन दिले असल्याचे तांबोळी यांनी सांगितले.

Web Title: letter of finance minister for junnar iti post