स्थलांतरित मुलांच्या शिक्षणासाठी स्वयंसेवी संस्थांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र 

Varsha-Gaikwad
Varsha-Gaikwad

पुणे - स्थलांतरित कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलणे आवश्यक असल्याचे स्वयं सेवी संस्थांचे म्हणणे आहे. या संदर्भातील निवेदन या संस्थांच्या वतीने राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना देण्यात आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरवर्षीप्रमाणे दिवाळीनंतर ऊसतोड कामगार, वीट भट्टी मजूर, आदिवासी भागातून हजारो मजूर बागायती पट्ट्यात  काम करण्यासाठी गाव सोडून गेले आहेत, दगडखाणीवर काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे. ही संख्या दरवर्षी साधारणत: तीस लाखांच्या आसपास असते. सध्या शाळा बंद असल्यामुळे या वर्षी मुलेही आई-वडिलांसोबत  साखर कारखाना, वीटभट्टी, दगडखाणी व इतर बागायती पट्ट्यात कामासाठी गेली आहेत. यातील बहुसंख्य पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्याने यांचे ऑनलाईन शिक्षण नाही होऊ शकत नाही. शाळा बंद असल्याने शालेय पोषण आहारही मिळत नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने साखर कारखाना वीटभट्टी दगडखाणी व बागायत शेती येथे आलेल्या मजुरांच्या मुलांचे जवळच्या शाळेतील शिक्षकांमार्फत दरवर्षी करतात तसे सर्वेक्षण करावे.

या विद्यार्थ्यांना आहे त्याच ठिकाणी जाऊन जवळच्या शाळेतील शिक्षकांनी ऑफलाइन अध्यापन करावे, अशी सोय उपलब्ध करून द्यावी. त्यात मुलांना अंतरावर बसवणे मास्क वापरायला लावणे त्यांना सॅनिटायझर व शैक्षणिक साहित्य त्या मालकाने उपलब्ध करून द्यावे. जेणे करून शिक्षकांची ही काळजी घेतली जाईल. शाळा बंद असल्याने पालकांना तांदूळ व डाळी दिल्या जात आहेत. यात सर्वेक्षणातील शाळांनी पुढील महिन्याच्या मागणीत विद्यार्थी संख्या दाखवावी आणि या पालकांना तांदूळ व डाळी दिली जावी.

पाठ्यपुस्तके शिक्षण विभागाकडे असतील तर ती या विद्यार्थ्यांना  द्यावीत, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे. यात उल्का महाजन (सर्वहारा जनआंदोलन, रायगड), हेरंब कुलकर्णी (नगर), प्रतिभा शिंदे (लोकसंघर्ष मोर्चा,नंदुरबार), दीनानाथ वाघमारे (संघर्षवाहिनी, नागपूर), दीपक नागरगोजे (शांतीवन, बीड),रुपेश कीर (समर्थन, मुंबई) आणि अनुराधा भोसले (अवनि, कोल्हापूर) यांनी स्वयं सेवक आणि स्वयंसेवी संस्थांनी शिक्षणमंत्र्यांना हे एकत्रित निवेदन पाठविले आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com