'ते' पत्र माओवाद्यांनीच पसरवले: पोलिस महासंचालक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

'सध्या समाजमाध्यमात  फिरत असलेल्या पत्राशी पोलिसांचा संबंध नाही. माओवादी कारवाया करणाऱ्यानीच हे पत्र पसरवले आहे,' असे पोलिस महासंचालक सतिश माथूर यांनी सांगितले आहे.

पुणे - 'भीमा कोरेगाव दंगलीस चिथावणी दिल्याप्रकरणी आणि नक्षलवाद्याशी संबंध असल्याच्या कारणावरुन पाच जणाना अटक केली. अटक केलेल्यांविषयी पोलिसाकडे ठोस पुरावे आहेत. या पुराव्याच्या आधारेच त्यांना अटक केली आहे, असे स्पष्टीकरण राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथुर यांनी शनिवारी दिले. पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या पोलिस पब्लिक स्कूलच्या कामाचे भूमीपुजन माथुर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

माथुर म्हणाले, 'सध्या समाजमाध्यमात  फिरत असलेल्या पत्राशी पोलिसांचा संबंध नाही. माओवादी कारवाया करणाऱ्यानीच हे पत्र पसरवले आहे. असेही त्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आलेल्या धमकीच्या पत्राच्या पार्श्वभुमीवर पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: The letter was circulated by the Maoists says satish mathur