कोरोनाग्रस्तांना मिळणार पुस्तकांची साथ; डॉ. नायडू रुग्णालयात नवे वाचनालय सुरू!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 एप्रिल 2020

रात्रीच्या वेळेत रुग्णालयांत असलेल्या डॉक्‍टर आणि परिचारिकांनाही स्वतंत्ररित्या पुस्तके मिळणार आहेत. 
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्या सर्व 71 रुग्णालयांत अत्याधुनिक सेवा-सुविधा उभारण्यात येत आहे.

पुणे : उपचारांत एकांतात असलेले कोरोनाचे रुग्ण आणि संशयितांना आता पुस्तकांची साथ मिळणार आहे. पुस्तकांसोबत मासिक, पाक्षिकही चाळता येणार आहे. खास या रुग्णांसाठी महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयांत नवे वाचनालय सुरू होणार असून, तिथे पाचशे पुस्तकांचा खजिना राहणार आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारपासून (ता.३) रुग्णांना त्यांच्या आवडीची हवी ती पुस्तके आणि ग्रंथ उपलब्ध होतील. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या उपक्रमासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांनी पुढाकार घेतला असून, या रुग्णालयांत पहिल्या टप्प्यांत एक हजार पुस्तके पुरविण्याचे नियोजन मानकर यांनी केले आहे. या आजाराच्या रुग्ण आणि संशयितांना किमान 14 दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. या काळात या लोकांना एकांतात राहावे लागते. त्यामुळे त्यांना कंटाळवाणे होत असल्याने त्यांना पुस्तके उपलब्ध करून देत आहोत. आर्थिक मदत करतानाच लोकांनी आपल्याकडील जुनी-नवी संग्रहीत पुस्तके महापालिकेकला द्यावीत, असे आवाहन मानकर यांनी केले आहे.

आणखी वाचा - अमेरिकेसाठी 9/11पेक्षा कोरोना घातक

दरम्यान, रात्रीच्या वेळेत रुग्णालयांत असलेल्या डॉक्‍टर आणि परिचारिकांनाही स्वतंत्ररित्या पुस्तके मिळणार आहेत. 
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्या सर्व 71 रुग्णालयांत अत्याधुनिक सेवा-सुविधा उभारण्यात येत आहे. त्यासाठी पुणेकर, संस्था, संघटना आणि खासगी क्षेत्रांनी (सीएसआर) अंतर्गत मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

- Coronavirus : तबलीगींच्या मौलानाने घेतला यू-टर्न; म्हणाला, 'मी स्वत: ...'

या पार्श्‍वभूमीवर मानकर यांनी सध्या रुग्णालयात असलेल्या रुग्णांच्या मनोरंजनासाठी सोई उपलब्ध करण्याला प्राधान्य दिले आहे. त्यातून रुग्ण आणि विलगीकरणात सामावून घेतलेल्यांच्या वाचनाची आवड जाणून घेऊन त्यांना अपेक्षित पुस्तके दिले जाणार आहेत. रोजच्या रोज रुग्णांच्या मागणीनंतर पुस्तके उपलब्ध होतील, असेही मानकर यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा - कच्चे तेल झाले पाण्या पेक्षा स्वस्त, दर वाचून आश्चर्य वाटेल!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Library started in Dr Naidu Hospital for Doctors and Corona affected patients