बारामती - 15 मे पासून बांधकामाचे परवाने ऑनलाईन

मिलिंद संगई
शुक्रवार, 11 मे 2018

बारामती (पुणे) : नगरपालिका हद्दीत या पुढील काळात आता बांधकामाचे परवाने ऑनलाईन दिले जाणार आहेत. लोकांचे हेलपाटे कमी करुन मानवी हस्तक्षेप कमी करण्याचा हा प्रयत्न असून 15 मे पासून ऑनलाईन बांधकाम परवाने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

महावास्तू पोर्टलच्या माध्यमातून हे परवाने दिले जाणार आहेत. नवीन घर किंवा इमारत उभी करायची असेल तर सर्वच कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करायची आहेत. अनिवार्य कागदपत्रे अपलोड केल्यानंतर नगर अभियंता संबंधित ठिकाणी भेट देणार आहेत. त्यांच्या अहवालानंतर लगेचच परवाना दिला जाणार असून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देखील ऑनलाईनच मिळणार आहे. 

या पूर्वी परवान्यासाठी कागदी प्लॅन सादर करावे लागत होते, आता मात्र ऑनलाईन प्लॅन अपलोड करायचे असल्याने ते ऑटोकॅड मध्ये करुनच अपलोड करावे लागतील. ही नवीन यंत्रणा असल्याने यात काही तांत्रिक अडचणी उदभवल्यास नगरपालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परवाना मागणी साठी तसेच बांधकाम पूर्णत्वासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता यात अनिवार्य असल्याने कागदपत्रांची तयारी करुनच नागरिकांना ऑनलाईन अर्जासाठी जावे लागणार आहे, यात नागरिक व नगरपालिका दोघांच्याही वेळ व श्रमाची बचत होणार आहे. 

मानवी हस्तक्षेप कमी करुन गतीने परवाने मिळावेत अशी शासनाची या मागील अपेक्षा असून त्या दृष्टीने नगरपालिका प्रयत्न करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Web Title: license for construction available online in baramati nagarpalika

टॅग्स