पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

​प्रकाश हा उमा यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना शिवीगाळ करत मारहाण करत होता. तसेच, जीवे ठार मारण्याच्या धमक्‍या द्यायचा. घटनेच्या दिवशी प्रकाश हा दारू पिऊन घरी आला होता. त्यावेळी त्यांच्यात वाद झाले. "थांब तुला खल्लास करतो' असे म्हणत उमा यांच्यावर चाकूने वार करून त्यांचा खून केल्याचे फिर्यादी म्हटले आहे. याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी काम पाहिले. या खटल्यात त्यांनी नऊ साक्षीदार तपासले.

पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा चाकूने वार करून खून केल्याप्रकरणी पतीला न्यायालयाने जन्मठेप व 5 हजार रुपयाच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त 6 महिने कारावास भोगावा लागेल असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. सत्र न्यायाधीश आर. व्ही. आदोणे यांनी हा आदेश दिला आहे.

प्रकाश ऊर्फ मुन्ना हनुमंत कुटके (वय 35, रा. चंदननगर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. यात उमा प्रकाश ऊर्फ मुन्ना कुटके (वय 25) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत शेजारी राहणाऱ्या शालन धोत्रे यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. ही घटना 2008 मध्ये आंबेडकरनगर झोपडपट्टी परिसरात घडली होती.

प्रकाश हा उमा यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना शिवीगाळ करत मारहाण करत होता. तसेच, जीवे ठार मारण्याच्या धमक्‍या द्यायचा. घटनेच्या दिवशी प्रकाश हा दारू पिऊन घरी आला होता. त्यावेळी त्यांच्यात वाद झाले. "थांब तुला खल्लास करतो' असे म्हणत उमा यांच्यावर चाकूने वार करून त्यांचा खून केल्याचे फिर्यादी म्हटले आहे. याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी काम पाहिले. या खटल्यात त्यांनी नऊ साक्षीदार तपासले.

पाच वर्ष घेतला तृतीयपंथीयांचा वेश :
प्रकाश व उमा यांना दोन मुले आहेत. प्रकाश ऊर्फ मुन्ना हा बिगारी काम करत होता. तर, पत्नी कचऱ्याच्या गाडीवरकाम करत होती. प्रकाश सतत चारित्र्यावर संशय घेत होता. यातूनच त्याने खून केला. खुनानंतर प्रकाश हा फरार झाला होता. तो पाच वर्ष पोलिसांना गुंगारा देत होता. याकालावधीत तो ओळखू नये म्हणून तृतीयपंथीचा वेश धारण करून राहत होता. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला 2013 साली अटक केली होत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: life imprisonment to husband who kills wife