मेहुण्याच्या खूनप्रकरणी एकास जन्मठेपेची शिक्षा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जुलै 2018

पुणे - बहिणीच्या प्रेमविवाहाला विरोध करणाऱ्या मेहुण्याचा खून करणाऱ्याला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी ही शिक्षा सुनावली. 

आलोक किशोर कांबळे (वय 28, रा. आंबेडकर सोसायटी, येरवडा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने आपला मेहुणा निखिल बाळू कदम (वय 24, रा. येरवडा) त्याचा 14 डिसेंबर 2014 रोजी खून केला होता. येरवड्यातील आंबेडकर सोसायटी परिसरातील व्यायाम शाळेसमोर रात्री हा गुन्हा घडला होता. आलोकने निखिलची बहीण नेहासोबत प्रेमविवाह केला होता. मात्र, या विवाहाला नेहाच्या कुटुंबीयांकडून विरोध होता. या वादातूनच आलोकने निखिलचा खून केल्याबाबतची फिर्याद बाळू कदम यांनी येरवडा पोलिसांत दिली होती. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील सुरेश गवळी यांनी काम पाहिले. पाच साक्षीदारांपैकी प्रत्यक्षदर्शी रोहित गवळी याची साक्ष महत्त्वाची ठरली. येरवडा पोलिस ठाण्याचे कर्मचारी प्रकाश भोसले व सुधीर चिकणे यांनी न्यायालयीन कामकाजासाठी साहाय्य केले. 

Web Title: life imprisonment for the murder of brother-in-law case