पेंटिंगचे दोनशे रुपये दिले नाही म्हणून खून करणाऱ्याला जन्मठेप

life imprisonment to one for Murder due to not paying two hundred rupees of painting was not paid
life imprisonment to one for Murder due to not paying two hundred rupees of painting was not paid

पुणे : पेंटिंगच्या कामाचे केवळ 200 रुपये दिले नाही म्हणून तरुणाच्या डोक्‍यात फरशी मारून खून करणाऱ्याला न्यायालयाने जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी हा निकाल दिला.

पुणे- नाशिक रस्त्याची वाहतूक कोंडी सुटणार कधी...

राहुल ऊर्फ उद्दल जगतबली सिंग (वय 24, रा. आश्रफनगर, कोंढवा) असे जन्मठेप झालेल्याचे नाव आहे. त्याला अविनाश ऊर्फ शिवा मधुकर जाधव (वय 29, रा. कोंढवा बुद्रूक) यांचा खून केला म्हणून शिक्षा झाली. याबाबत जाधव यांची पत्नी आशा (वय 27) यांनी कोंढवा पोलिसात फिर्याद दिली होती. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील सुनील मोरे यांनी काम पाहिले. त्यांनी 8 साक्षीदार तपासले.

पुण्यासह 'या' पाच ठिकाणी असणार एसटीच्या 'ई-बस चार्जिंग स्टेशन...

19 एप्रिल 2015 रोजी कोंढव्यातील आश्रपनगरमध्ये जाधव यांचा खून झाला होता. अविनाश हे पेंटिंगची कामे घेत. त्यानंतर त्यांच्याकडे कामाला असलेल्या कर्मचाऱ्याकडून कामे करवून घेत. राहुल याच्या मामाचे पेंटिंगचे 200 रुपये अविनाश यांच्याकडे राहिले होते. या कारणावरून त्याने अविनाश यांना लाथाबुक्‍क्‍यांनी जोरात मारहाण केली. त्यानंतर डोक्‍यात फरशी मारून जबर जखमी केले. रक्तस्राव होत असल्याने पोलिस रुग्णवाहिकेतून अविनाश यांना ससून रुग्णालय येथे घेऊन गेले. उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे सांगण्यात आले.

पुणे : पीएमपी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू 

या प्रकरणी पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, त्याला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी अॅड. सुनील मोरे यांनी केली. दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com