मित्राच्या खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मे 2019

पूर्ववैमनस्यातून चाकूने वार करून मित्राचा खून करणाऱ्या दोघांना न्यायालयाने जन्मठेप आणि प्रत्येकी साडेतीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

पुणे - पूर्ववैमनस्यातून चाकूने वार करून मित्राचा खून करणाऱ्या दोघांना न्यायालयाने जन्मठेप आणि प्रत्येकी साडेतीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. भैसारे यांनी हा निकाल दिला.  किशोर प्रकाश शिंदे (वय २७, रा. वडगावशेरी, मूळ रा. भिगवण) आणि भक्त दुर्गाचरण त्रिपाठी (वय ४१, रा. रामवाडी, मूळ ओरिसा) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. त्यांनी मयूर ऊर्फ बंटी ज्ञानेश्‍वर घोलप (वय ३३, रा. चंदननगर) यांचा १० जुलै २०१४ रोजी खून केला होता.  

या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील जावेद खान यांनी काम पाहिले. त्यांनी २० साक्षीदार तपासले. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The life imprisonment for two of the friends murder case