पुणे : अल्पवयीन पुतणीवर बलात्कार करणा-या काकाला जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

अल्पवयीन पुतणीला घरी नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या काकाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. खटल्यादरम्यान पीडित मुलगी फितूर झाली होती. मात्र परिस्थितिजन्य पुराव्याचा आधारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोटे ही शिक्षा सुनावली.

पुणे : अल्पवयीन पुतणीला घरी नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या काकाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. खटल्यादरम्यान पीडित मुलगी फितूर झाली होती. मात्र परिस्थितिजन्य पुराव्याचा आधारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोटे ही शिक्षा सुनावली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या प्रकरणी पाच वर्षीय पीडित मुलीच्या आईने पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. ही घटना 13 ऑगस्ट 2013 रोजी पौडमधील मुगाव परिसरात घडली होती. संबंधित मुलगी आपल्या आई-वडील आणि दोन भावासोबत राहत. मुलीचे आई-वडील मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. घटनेच्या दिवशी तिच्या आईने मुलीला त्याच गावात राहणाऱ्या तिच्या आजीकडे सोडले व त्यानंतर त्या कामाला गेल्या होत्या. संध्याकाळी कामावरून परत आल्यानंतर मुलगी घाबरून रडत असल्याचे आईने पाहिले. त्यावेळी तिच्याकडे विचारपूस केली असता दुपारी तिच्यासोबत घडलेला प्रकार तिने सांगितला. त्यामुळे मुलीच्या आईने पौड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार आरोपीवर बलात्कार, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोस्को) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न देण्याची मागणी

या खटल्याचे कामकाज अतिरिक्त सरकारी वकील सुनील हांडे आणि ऍड. जावेद खान यांनी पाहिले. न्यायालयाने एकूण 10 साक्षीदार तपासले. जन्मठेपेबरोबर आरोपीला 10 हजार रुपयांची दंड सुनावण्यात आला आहे. ही रक्कम पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावे, असे आदेशात नमूद केले आहे.

म्हणून त्यांनी मुलाचे नावच ठेवले 'काँग्रेस'

साक्षीदरम्यान पीडित मुलगी फितूर झाली होती. मात्र न्यायालयाने परिस्थितीजन्य पुरावा, मुलीच्या अंगावरील व कपड्यावरील रक्त. त्याच बरोबर आजीने आरोपीला मुलीला घेऊन जाताना पाहिले होते. या पुराव्याचा आधार घेत न्यायालयाने घेतला. आरोपीला त्याचा अंगावरील रक्ताबाबात योग्य खुलासा करता आला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: life imprisonment for victim who rapes minor girl in pune