Thur, June 8, 2023

पुणे : जीवरक्षक बच्चुसिंग टाक यांनी कालव्यातून काढले तीन मृतदेह
Published on : 8 May 2022, 1:23 pm
उंड्री - शिंदेवस्ती आणि हडपसर वाहतूक शाखेजवळील कालव्यातून वाहत आलेले तीन मृतदेह जीवरक्षक डॉ. बच्चुसिंग टाक यांनी बाहेर काढले. पोलिसांनी पंचनामा करून शहिद भगतसिंग जीवनरक्षक फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेमध्ये शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविल्याचे पोलिसांनी सांगितले.
जीवरक्षक बच्चूसिंग टाक म्हणाले की, कालव्यात मृतदेह वाहत येत असल्याची माहिती पोलिसांनी दिल्यानंतर तात्काळ घटनास्थळी धाव घेत हडपसर वाहतूक शाखेजवळ दोन मृतदेह बाहेर काढले. त्याच दरम्यान नागरिकांनी शिंदेवस्ती येथे मृतदेह वाहत येत असल्याची माहिती मिळाली. तेथे आझादसिंग बच्चुसिंग टाक यांनी धाव घेत पुरुष जातीचा मृतदेह बाहेर काढला. या तिन्ही मृतदेहांची ओळख पटली नाही. पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविले. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.