पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाला सुरुवात, पण...

पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाला सुरुवात, पण...

पिंपरी : शहर परिसरात रविवारी पाऊस चांगला बरसला. हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाने पिंपरी-चिंचवडवासीयांना थोडासा दिलासा मिळाला. मात्र, दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्याने विश्रांती घेतली. 

शहर परिसरात मागील जून महिन्यात पावसाने तुरळक हजेरी लावली आहे. पावसाळी ढगाळ वातावरण तयार झाले आहे. मात्र, अजून चांगला पाऊस झालेला नाही. शहरात दोन दिवसांपूर्वी पाऊस झाला. मात्र, त्याला तितकासा जोर नव्हता. रविवारीदेखील हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. काही भागांत शनिवारी रात्रीपासूनच पावसाची रिपरिप चालू झाली होती. तर काही ठिकाणी सकाळपासून पाऊस पडण्यास सुरुवात झाली. शहराच्या बहुतेक भागांत कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे, ठिकठिकाणी रस्त्यांच्या सखल भागांत पाण्याची डबकी तयार झाली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपळे सौदागर, चिखली भागांत शनिवारी रात्रीपासूनच पाऊस सुरु झाला. पिंपळे सौदागर येथे रविवारी दुपारपर्यंत अधून-मधून सरी पडल्या. तर चिखली परिसरात सकाळी त्याने जोरदार हजेरी लावली. भोसरीत सकाळी 6 वाजल्यापासून पावसाची भुरभूर चालू राहिली. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पावसाने विश्रांती घेतली. सांगवी, दापोडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, मोशीगाव, मोशी प्राधिकरण, चऱ्होली, वडमुखवाडी, भागांतही पाऊस झाला. पिंपरी कॅम्प परिसरामध्ये लोक साप्ताहिक सुट्टी साधून खरेदीसाठी आले होते. मात्र, पाऊस पडत असल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले. काहीजणांनी छत्र्या नसल्याने तारांबळ उडाली. पथारी विक्रेत्यांनी छत्र्या उघडून पावसापासून बचाव केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com