पुण्यात पाकिस्तानी झेंड्यावर लायटर फ्री

pune.jpg
pune.jpg

पुणे : पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानात घुसून बदला घ्या, त्यांना धडा शिकवा,’ अशा संतप्त प्रतिक्रिया देशभरातून उमटत असताना पुण्यात मुरुडकर झेंडेवाल्यांकडून पाकिस्तानी झेंड्यावर लायटर फ्री देत निषेध व्यक्त केला आहे. 

‘हा हल्ला विसरणार नाही, बदला घेऊ’, असा स्पष्ट इशारा ‘सीआरपीएफ’ने दिला, तर ‘दहशतवादी संघटना आणि त्यांच्या पाठीराख्यांनी मोठी चूक केली आहे. त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारवाईची दिशा स्पष्ट केली. दरम्यान या हल्ल्याचा निषेध पुण्यातही केला जात आहे. पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांनी पाकिस्तानच्या झेंडा खरेदी करणाऱ्याला लायटर आणि काडीपेटी फ्री देवून या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. कधी नव्हे इतकी मागणी गेल्या दोन दिवसात पाकिस्तानच्या झेंड्याला आहे.

''ज्यांनी आपले जवान मारले, जाळले अशा देशाचा झेंडा आपण का जाळू नये.'', अशी संतापजनक भावना आज प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. ही भावना पाकिस्तानपर्यंत पोहचायला हवी. यासाठी पाकिस्तानच्या झेंड्यावर आम्ही लायटर आणि काडीपेटी फ्री देत आहोत'' अशी प्रतिक्रिया मुरुडकर झेंडेवाले यांनी यावेळी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com