पावसामुळे रस्ता बांधणीच्या कामाला मर्यादा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

टाकवे बुद्रुक : पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून आंदर मावळात मोरमारवाडी, डोंगरवाडी, सटवाईवाडी, हेमाडेवस्ती या रस्त्याचे काम सुरू आहे. डोंगराच्या चढावर डोंगर फोडून हा रस्ता पूर्ण केला जाईल, त्यामुळे डोंगर पठारावरील डोंगरवाडी, सटवाईवाडी, हेमाडेवस्ती, धनगर पठारावरील नागरिकांच्या दळणवळणाची सोय होईल.

टाकवे बुद्रुक : पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून आंदर मावळात मोरमारवाडी, डोंगरवाडी, सटवाईवाडी, हेमाडेवस्ती या रस्त्याचे काम सुरू आहे. डोंगराच्या चढावर डोंगर फोडून हा रस्ता पूर्ण केला जाईल, त्यामुळे डोंगर पठारावरील डोंगरवाडी, सटवाईवाडी, हेमाडेवस्ती, धनगर पठारावरील नागरिकांच्या दळणवळणाची सोय होईल.

लाखो रूपये खर्च करून आधुनिक यंत्राच्या मदतीने रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सहा महिन्यात वळणवळणाने रस्ता फोडून त्यावर मुरूम मातीचा भराव टाकला. खडी पसरून डांबरीकरण करण्याची तयारी सुरू आहे, पण आता पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामाला मर्यादा येत आहे. वळणवळणाचा रस्ता खोदकाम करताना मुरूम माती निखळली आहे. रस्त्याच्या दुतर्फा गटार खोदले आहे. हा संपूर्ण पठार पावसाचे आगर म्हणून परिचित आहे, त्यात रस्त्याच्या अलिकडे आणि पलिकडे मोठमोठे धबधबे वाहू लागतील. डोंगराच्या कुशीतून पावसाचे पाणी वाहते. सतत पाऊस असतो, त्यामुळे पावसाचे पाणी मातीच्या गटारात वाहू लागेल, संभाव्य धोका हा आहे की, रस्त्यासाठी खोदलेल्या गटारातून पाणी डोंगराच्या भूभागात झिरपत राहिले आणि माती निखळू लागली तर त्या खाली मोरमारवाडी गावात माळीणच्या घटनेची पुन्नारवृत्ती होण्याची भीती गावकरी व्यक्त करीत आहे. सध्या मोरमारवाडी कर जीव मुठीत धरून रात्र काढीत आहे. 

गुलाब गभाले सरपंच वडेश्वर म्हणाले, "वडेश्वर, गभालेवाडी, मोरमारेवाडी, माऊ ही सगळी वडेश्वर ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत आहे, मोरमारेवाडीतून डोंगरवाडीला जोडणारा पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रस्ता जातो, रस्त्याच्या उत्खननात मुरूम, माती, दगड निघाले आहे, ते पावसाळ्यात मोठ्या ओढ्याने मुख्य रस्त्यावर किंवा मोरमारेवाडीत येऊ शकतो. ही सर्व गावे वाडया वस्त्या भीतीत वावरत आहे. शासनाने माऊ, वडेश्वर, मोरमारवाडी, गभालेवाडीतील पुनर्वसनाचा कोणताच प्रस्ताव ठेवला नाही. 

माऊतील दिलीप जगताप व अशोक जगताप  म्हणाले, "आम्ही दोघे भाऊ येथे राहतो, घरात अकरा माणसे आहेत. मागील वर्षी मुसळधार पावसात रात्री दरड कोसळली, जीवात जीव राहीला नाही, याही वर्षी भीतीचे सावट कायम आहे. 

Web Title: limitations to construction of road because of rain