सिंहाचे दर्शन आजपासून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 एप्रिल 2017

पुणे - उन्हाळ्याच्या सुटीत पेंग्विन पाहण्याचा आनंद मुंबईकर लुटत आहेत. त्यामुळे पुण्यातील प्राणिसंग्रहालयातही यंदाच्या सुटीत नव्याने काय पाहायला मिळणार, याबद्दल अनेकांमध्ये उत्सुकता असल्याचे पाहायला मिळते; परंतु आता कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात अवघ्या काही महिन्यांपूर्वी आलेल्या ‘सिंहा’चे दर्शन पुणेकरांना रविवारी (ता. ९) होणार आहे. त्यामुळे उद्या प्राणिसंग्रहालयातील नवा पाहुणा पुणेकरांना पाहता येणार आहे. 

तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गुजरातमधील सक्करबाग प्राणिसंग्रहालयातून (जुनागढ) सिंहाची एक जोडी जानेवारीत पुण्यात आणण्यात आली. 

जवळपास १२ हून अधिक वर्षांपूर्वी पुण्यातील पेशवे पार्कमध्ये सिंह होता; मात्र त्यानंतरच्या काळात पुणेकरांना सिंहाचे दर्शन झाले नाही. म्हणूनच कात्रज येथील प्राणिसंग्रहालयात सिंह आणावा, या मागणीने जोर धरला आणि त्यासाठीची प्रक्रिया तीन-चार वर्षांपूर्वी सुरू झाली. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (सीझेडए) या मागणीसंदर्भातील प्रस्तावाला दोन वर्षांपूर्वी मान्यता दिली होती.

उन्हाळ्याच्या सुटीत पुणेकरांनी आणि बच्चे कंपनीला सिंहाला पाहता यावे, यासाठी स्वतंत्र खंदक बांधण्यात येत असून, त्याचे कामही सुरू झाले आहे; मात्र पांढऱ्या वाघाच्या खंदकात या सिंहाच्या जोडीची तात्पुरती सोय केली आहे. त्यामुळे या खंदकाशेजारी असलेल्या वाघाच्या खंदकात पांढरा वाघ आणि रॉयल बेंगॉल वाघ आलटून पालटून पाहायला मिळतील. सिंहाची जोडी आजपासून (ता. ९) पुणेकरांना पाहता येईल. 
- राजकुमार जाधव, संचालक, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय

पांढऱ्या वाघाच्या खंदकात ‘सिंहा’ची ही जोडी पाहायला मिळणार

तेजस आणि सुब्बी ही सिंहाची जोडी जुनागढ येथून जानेवारीमध्ये पुण्यात दाखल

Web Title: lion darshan today