शिवनेरी परिसरातील बिबटया आज पहाटे पिंजऱ्यात जेरबंद

दत्ता म्हसकर
रविवार, 6 ऑगस्ट 2017

पर्यटक व स्थानिक रहिवाशी यांना दिवसाढवळ्या दिसणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात जुन्नर वनविभागाला यश आले आहे. बारव ता जुन्नर येथे किल्ले शिवनेरीच्या परिसरात रविवार दि 6 रोजी पहाटे साडे पाच वाजता ७ वर्षाचा नर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला असल्याची माहिती वनपाल कृष्णा दिघे यांनी दिली. 

जुन्नर: पर्यटक व स्थानिक रहिवाशी यांना दिवसाढवळ्या दिसणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात जुन्नर वनविभागाला यश आले आहे. बारव ता जुन्नर येथे किल्ले शिवनेरीच्या परिसरात रविवार दि 6 रोजी पहाटे साडे पाच वाजता ७ वर्षाचा नर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला असल्याची माहिती वनपाल कृष्णा दिघे यांनी दिली. 

किल्ले शिवनेरी च्या परिसरात असणाऱ्या बारव वस्तीजवळ तारिक अमरुल्ला खान यांच्या गट नं १८ मध्ये दि ४ रोजी वनविभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात आला होता. पूर्व बारव, शिवराई संकुल परिसर, किल्ले शिवनेरीकडे जाणारा मुख्य रस्ता या ठिकाणी दिवसाढवळ्या पर्यटक व स्थानिक रहिवाशी यांना बिबट्याचे दर्शन होत होते.  सायंकाळी सहाच्या सुमारास किल्ले शिवनेरी वर फिरण्यास जाणाऱ्या नागरिकांनाही बिबट्या रस्त्यावरून फिरतांना अनेकदा दिसला होता.

बिबट्याचा वावर या भागात असल्याने नागरिकांमध्ये व पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर कुसुर, वडज, धामणखेल व बारव याठिकाणी या बिबट्याने जनावरांवर हल्ले केल्याच्या घटना देखील घडल्या होत्या. स्थानिक नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी केल्याने जुन्नर वनविभागाचे उपवनसरंक्षक अर्जुन म्हसे, सहायक उपवनसरंक्षक युवराज मोहिते व वनपरिक्षेत्र अधिकारी जयंत पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पिंजरा लावण्यात आला. वनपाल कृष्णा दिघे, वनरक्षक संजय गायकवाड, विश्वास दुधवडे, नवनाथ दुधवडे, सागर भगत, संतोष भालेकर यांनी पिंजरा लावण्याचे काम केले.

Web Title: liopold catch junnar esakal news