अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य उपेक्षितच 

अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य उपेक्षितच 

पुणे - मराठी साहित्यात आपल्या मौलिक साहित्याने भर घालणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे सात खंड प्रकाशित करण्याचे नियोजन राज्य सरकारने केले असताना, त्यातील पाच खंडांचे काम तीन वर्षांपासून रखडले आहे. राज्य सरकारची उदासीनता त्यास कारणीभूत असल्याचा आरोप अण्णा भाऊ साठेप्रेमींनी केला आहे. तर, आगामी वर्ष अण्णा भाऊंचे जन्मशताब्दी वर्ष असून, त्यात तरी उर्वरित खंड मार्गी लागणार का, या बाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

आपल्या साहित्यातून उपेक्षितांची दुःखे मांडणाऱ्या अण्णा भाऊंच्या साहित्याचे एकत्रित प्रकाशन व्हावे, असा निर्णय मागील राज्य सरकारच्या काळात राजेश टोपे शिक्षणमंत्री असताना झाला. त्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने अण्णा भाऊंचे सगळे साहित्य मोठ्या कष्टाने जमा केले. एकूण सात खंड प्रकाशित करण्याचा आराखडा समितीने तयार केला. या सात खंडांत पहिले तीन खंड कादंबऱ्या, दुसरे दोन खंड कथा आणि इतर खंडांत पोवाडे, प्रवास वर्णने, व्यक्तिचित्रे आणि इतर साहित्याचा समावेश करण्याचे नियोजन होते. या सात खंडांपैकी दोन खंड प्रकाशित झाले आहेत. त्यात 19 कादंबऱ्याचा समावेश आहे. दोन खंड प्रकाशित होऊन आता तीन वर्षांचा अवधी लोटला आहे. त्यानंतर मात्र उर्वरित खंडांचे मात्र ठप्प झाले आहे. 

दलित युवक आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सचिन बगाडे म्हणाले, ""अण्णा भाऊ साठे यांची मृत्यूनंतरही उपेक्षा थांबलेली नाही. प्रकाशित झालेल्या दोन खंडांच्या प्रतींची संख्याही अपुरी आहे. अण्णा भाऊंचे साहित्य प्रकाशित करण्यातील सरकारची निष्क्रियता सिद्ध झाली आहे. आगामी वर्ष अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष आहे या वर्षात तरी अण्णा भाऊचे साहित्य प्रकाशित करावे.'' 

राज्य सरकारकडून समितीला कोणतेही सहकार्य केले जात नाही. त्यामुळे दोन खंडांनंतर काम ठप्प झाले आहे. समितीला मुदतवाढही दिलेली नाही. त्यामुळे पुढील खंड प्रकाशित होण्याची शक्‍यता धूसर आहे. 
- राजेंद्र कुंभार, सदस्य सचिव,  साहित्य प्रकाशन समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com