'माझ्याशी पंगा' या नाट्याचा सुरु आहे आॅनलाइन दंगा...

drama1.jpg
drama1.jpg

कोथरुड (पुणे) : कोरोनाने आलेली मरगळ, निराशा झटकून देत जीवनातील नाट्यमयता, आपली कला, अभिव्यक्ती जिवंत ठेवण्यासाठी विविध प्रकारचे प्रयोग सुरु आहेत. नाट्यगृह कधी उघडतील, प्रेक्षक कधी येतील ते माहित नाही. पण कोरोनाचे सर्व नियम पाळून वर्तमानाची गरज ओळखून ऑनलाइन लाइव्ह नाट्यकला विकसित करण्याची ध्येय प्रेरित कृती प्रा. देवदत्त पाठक आणि मिलींद केळकर या जोडगोळीने केली आहे. 

गेल्या सात दिवसात १५ प्रयोग करून २५ व्या प्रयोगापर्यंत पोहचण्याची घोडदौड  'माझ्याशी पंगा' य़ा ऑनलाइन लाइव्ह नाट्याने केली आहे. कोथरुडमधील नाट्य प्रशिक्षक पाठक यांनी अन्वित हर्डीकर, वशिष्ठ राऊत, वेदांग टिटवे, विभूती राऊत, हर्षिता सराफ, कैवल्य कुर्लेकर या बालकलाकारांना ऑनलाइन नाट्यकलेचे प्रशिक्षण दिले. त्याला साथ स्वाती टिटवे, पल्लवी राऊत, युगंधरा कुर्लेकर, सुहासिनी सराफ, ऐश्वर्या हर्डीकर या पालकांनी दिली.  


नाट्यकलेचे सजीव तत्त्व आता प्रेक्षागृहात परत कधी दिसेल माहित नाही. पण नाट्यकला मात्र जिवंत राहिल ती प्रासंगिक गरज म्हणून व रंगकर्मींच्या भूमिकेतील लवचिकता आणूनच त्यासाठी ऑनलाइन नाट्यप्रयोगाचा पर्याय सर्वांनीच सध्या स्विकारायला हवा असे मत प्रा. देवदत्त पाठक य़ांनी व्यक्त केले.

शिवरायांच्या स्वराज्याचा एक मुख्य शिलेदार तोरणा ऊर्फ प्रचंडगड
 
लॉकडाऊन जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून ऑनलाईन नाट्य प्रशिक्षणासाठी आवाहन करून नाट्यकला क्रियाशील ठेवलीय. पुणे, नाशिक, मुंबई, कोथरुड, शनिवार पेठ अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांनी मुलांचे प्रशिक्षण घेतले. तालमी सुरु केल्या. कनेक्ट होण्यातील प्रचंड अडचणींवर मात करून छोट्यांनी न कंटाळता तीनतीन तास तालीम केली. काही जण तर रंगभूमीवर पहिल्यांदाच उभे राहिले होते. या बालनाट्याचे लेखन/दिग्दर्शन पाठक यांनी केले आहे. प्रेक्षकांना समाजमाध्यमावर आवाहन करून त्याचे प्रयोग चालू ठेवलेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com