#TrafficUpdates : शहरात येताय? थांबा! ट्रॅफिकची परिस्थिती घ्या जाणून

pune.jpg
pune.jpg

पुणे : संध्याकाळची वेळ झालीये...घरी जाऊन मस्त चहा घेवून जरा आराम करायचा विचार करत असाल ना. पण रस्त्यावरील वाहतूक कोंडीत अडकलात तर सगळ्या प्लॅनिंगवर पाणी सुटेल. जरा थांबा....कोणत्या रस्त्यावर काय स्थिती आहे, कोणता पर्यायी मार्ग आहे हे जाणून घ्या आणि मग बाहेर पडा. 

#TrafficUpdates : पुणे मुंबई महामार्गावर खडकी ते बोपोडी सिग्नल चौक मोठ्या प्रमाणात दुतर्फा वाहतूककोंडी झालू असून संथ गतीने वाहतूक सुरू
 आहे. बोपोडी ते खडकी दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे संथ गतीने काम सुरू असून संध्याकाळी ५ वाजल्यापासून कोंडी झाली आहे. अंदाजे  रात्री १० वाजेपर्यंत कोंडी सुटण्याची शक्यता  आहे. पर्यायी रस्ता नसल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे.  बोपोडी सिग्नल चौकात फक्त वाहतूक पोलिस दिसतात, पुढे खडकी, सीईफव्हीडी ग्राउंड जवळ छेद रस्त्याजवळ ही पोलीस कधीतरीच दिसतात  येथे कायमस्वरूपी सकाळ संध्याकाळ वाहतूक पोलिसांची आवश्यकता आहे.

#TrafficUpdates :  खडकवासला गावठाण, पानशेत रस्ता, खडकवासला चौपाटी, किरकटवाडी फाटा, नांदेड फाटा या भागात वाहतूकीचा वेग मंदावला आहे. अंदाडे 6:30 वाजल्यापासून कोंडी झाली असून 7:30 वाजेपर्यंत सुटेल. गावठाणातील अरुंद रस्ता, धरण चौपाटीमुळे कोंडी झाली आहे 

#TrafficUpdates : वारजे गणपती माथा ते शिवणे शिंदेपुल भागात  सायंकाळी 6 वाजल्यापासून वाहतूक कोंडी झाली आहे. शिंदे पूल चौक रस्त्यावर रुंदीकरण व काँक्रीटकरणचे काम सुरू आहे. अंदाजे 8:30 वाजेपर्यंत सुटेल.या भागात ट्रॅफीक वॉर्डन नाहीत तसेच वाहतूक पोलिसांचे मनुष्यबळ कमी असून परिणामी वाहतूकीचा वेग मंदावतो. 

#TrafficUpdates कर्वे रस्त्यावर अभिनव चौकात सांयकाळी ६ :३० वाजल्यापासून वाहतूक कोंडी झाली आहे. मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे वाहतूक मंदावली असून सायंकाळी 8:30 वाजल्यानंतर कोंडी सुटेल. मेट्रोचे वॉर्डन आणि वाहतूक पोलिसांचे मनुष्यबळ कमी असल्याने 
वाहतूकीचा वेग मंदावतो. 

#TrafficUpdates : पुणे मुंबई महामार्गावरील कात्रज बाह्यवळण, सिंहगड रोड ते माणिक बाग आणि वडगाव पुलाखालील चौकात मोठ्या प्रमाणात दुतर्फा वाहतूक कोंडी झाली असून संथ गतीने वाहतूक सुरू आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून धायरी फाटा ते धायरी गावात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. नित्याचीच वाहतूक कोंडी अंदाजे रात्री ९ वाजेपर्यंत सुटेल. धायरीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नवले ब्रिज पासून, मानाजी नगर, पारी कंपनी, बेनकर वस्ती रस्त्याचा वापर करावा. वडगाव पुलाखाली सिग्नल चौकात फक्त वाहतूक पोलीस वाहनचालकांच्या पावत्या करताना दिसतात.  पोलीस कधीतरीच दिसतात. येथे कायमस्वरूपी सकाळ संध्याकाळ वाहतूक पोलिसांची आवश्यकता आहे.

 #TrafficUpdates : खडकी-आंबेगाव रस्त्यावर दररोज सायंकाळ 6.30 ते 7.30 दरम्यान वाहतूक कोंडी होते. अरुंद रस्ता, अवैध रिक्षा वाहतूक, मोकाट जनावरे यांमुळे वाहतूक कोंडी होते. वाहतूक पोलिस आणि खडकी कॅन्टोन्मेंट रस्त्यावर  कर्मचारी वाहूतक निंयत्रणात आणण्यासाठी सक्रिय असतात. 

 #TrafficUpdates : वारजे हायवे चौकात संध्याकाळी 7 वाजल्यापासून
 वाहतूक कोंडी झाली असून संथ गतीने वाहतूक सुरू आहे. अनेक सिग्नल एकत्रित येत असल्याने कोंडी झाली असून अंदाजे 9 वाजेपर्यंतसुटण्याची शक्यता आहे.योग्य नियोजनाची गरज असून वाहतूक पोलीस एकाच ठिकाणी उभे असतात. सर्व बाजूला उभे राहणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com