पुणेकरांनो...वाहतूककोंडीपासून सुटका हवीये?तर, मग हे करुन पाहा

pune.jpg
pune.jpg

पुणे : कोंडी पासून सुटण्यासाठी पुणेकर काहीही करायला तयार असतात. कोंडीतून वाचण्यासाठी कधी गल्ली बोळातून रस्ता काढतील तर कधी कोंडी अडकू नये म्हणून घरीच बसून राहतील. कोंडीचा अंदाज घेवून नियोजन करुन घराबाहेर पडतात खरं पण, कधी कोणत्या रस्त्यावर कोंडी होईल सांगता येत नाही. पुणेकरांनो....वाहतूक कोंडी पासून सुटका हवी असेल तर जरा वाहतूक कोंडीचा आढावा घेवून मगच बाहेर पडा. 


 #TrafficUpdates : औंध 
मनपाकडून शिवाजीनगर
स्थानकाकडे जाताना स.गो.बर्वे चौक भुयारी मार्गापासून शिवाजीनगर बस स्थानकापर्यंत वाहतूक संथ गतीने सुरू आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून कोंडी झाली असून अंदाजे 9 वाजेपर्यंत सुटेल. एकाच वेळी तीन ठिकानांवरून वाहने शिवाजीनगर च्या दिशेला जाताना सिमला ऑफिस चौक च्या अलीकडे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला वळताना वाहतुक खोळंबते त्यामुळे तिन्ही बाजूने येणारी वाहनांची गती मंदावते. भुयारी मार्ग संपताच उजवीकडे, डावीकडे व सरळ जाण्यासाठी प्रायोगिक तत्वावर दुभाजक टाकण्यात यावे. यामुळे वाहतूकीला शिस्त लागेल.

महामार्गापासून सायकर चौक, बालेवाडी फाटा ते  शिवाजीनगर मार्गावर बाणेर येथे वाहतूक धिम्या गतीने होत आहे. संध्याकाळी ७ वाजल्यापासून वाहतूक कोंडी झाली आहे. रोजच्या वाहनांची प्रचंड संख्या व एकाच वेळेत हिंजवडीकडून येणारी वाहने यामुळे कोंडीत भर पडते. तसेच उपरस्त्यावरून मुख्य रस्त्यावर चारचाकी वाहने येतांना वळवण्यास लागणारा वेळ यामुळे इतर वाहने अडकून पडतात. अंदाजे रात्री साडे आठ वाजेपर्यंत कोंडी सुटेल.  शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असल्याने वाहने चालवतांना विरूध्द दिशेने न जाता सरळ जावे जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही. 

#TrafficUpdates :  सिंहगड रस्ता/ कोथरुड
नांदेड फाट्यावर सांयकाळी 6:30 वाजल्यापासून वाहतूक कोंडी झाली असून वाहतूकीचा वेग मंदावला आहे. नांदेड गावठाणाकडे जाणारा रस्ता अरुंद असून येथे अनेक अतिक्रमणे केली आहेत. तसेच रस्त्यात विजेचा खांबाचा अडथळा होत आहे. अंदाजे सायंकाळी 8 नंतर कोंडी सुटेल. वाहनचालकांनी पर्यायी रस्ता म्हणून नांदेड सिटीमार्गाचा वापर करावा

 शिवणे नवभारत हायस्कुल ते शिंदेंपुल धनगरबाबा बसस्टॉप येथे संध्याकाळी 6 वाजल्यापासून वाहतूक वेग कमी झाला आहे. शिंदे पूल चौकात रस्ता रुंदीकरण व काँक्रीटकरण काम सुरु असल्याने कोंडी होते. रस्त्यात येणारी झाडे, अतिक्रमण, विजेचे खांब काढले पाहिजेत. अंदाजे 9.30 नंतर कोंडी सुटे
 
 नांदेड-शिवणे पूलाजवळ सांयकाळी 6: 30 वाजल्यापासून वाहतूक कोंडी झाली आहे. मुठा नदीवरील अरुंद पूल असल्याने दुचाकी, चारचाकी वाहने ये-जा होत नाही म्हणून दुसऱ्या बाजूला वाहनांची रांग लागतात. 

भीमनगर, उत्तमनगर बसस्टॉप, भाजी मंडई, उत्तमनगर पोलिस ठाणे, कवडे हॉस्पिटल आहिरे गेट वाहतूक कोंडी झाली आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून कोंडी झाली असून  8:30  वाजेपर्यंत सुटेल. पालिका अतिक्रमणावर कारवाई करत नाही तसेच  दुचाकी रस्त्यावर उभी करुन ग्राहक भाजी खरेदी करतात. वारजे वाहतूक विभागाकडून कारवाई होत नाही. 

आठवले चौक ते अभिनव चौक, अभिनव चौक ते पौड फाटा उड्डाणपुल येथे रस्ता वाहतूक कोंडीने बंद पडला आहे. सांयकाळी ६ :३० वाजल्यापासून वाहतूक कोंडी होत असून रात्री 8:30 नंतर सुटेल.  मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असून दररोजचीच समस्या झाली आहे. मेट्रोचे वॉर्डन आणि वाहतूक पोलिस सक्रिय आहेत पण वाहतूक पोलिसांचे मनुष्यबळ कमी
पडते. परिणामी वाहतूकीचा वेग मंदावतो. कोथरूड वाहतूक विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता. 

 सिंहगड रस्ता सांयकाळी 6 वाजल्यापासून कोंडी झाली असून रात्री 9 वाजेपर्यंत सुटेल. हिंगणे ते वडगाव, फन टाईम थिएटर रस्त्याला नित्याची कोंडी असते.  तसेच बुधवारचा अधिकृत भाजी बाजारात अनाधिकृत भाजी विक्रे्त्यांमुळे कोंडीत भर पडते. पर्यायी रस्त्यावर अनेक अतिक्रमणे, रस्त्यात झाडे तोडून ठेवली त्याचा कचरा देखील तसाच पडून असल्याने तेथेही कोंडी आहे. दत्तवाडी वाहतुक विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com