यकृत दानाने वाचवले वडिलांनी मुलीचे प्राण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

पुणे - वडिलांनी केलेल्या यकृत दानाने नऊ वर्षांच्या मुलीचे प्राण वाचविण्यात पुण्यातील वैद्यकीय तज्ज्ञांना यश आले. निष्णात डॉक्‍टर्स आणि अद्ययावत वैद्यकीय उपकरणांमुळे यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे शक्‍य झाली.

पुणे - वडिलांनी केलेल्या यकृत दानाने नऊ वर्षांच्या मुलीचे प्राण वाचविण्यात पुण्यातील वैद्यकीय तज्ज्ञांना यश आले. निष्णात डॉक्‍टर्स आणि अद्ययावत वैद्यकीय उपकरणांमुळे यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे शक्‍य झाली.

अशक्तपणा आणि भूक लागत नसल्याने "त्या‘ मुलीला रुग्णालयात दाखल केले होते. तिला कावीळ झाल्याचे निदान डॉक्‍टरांनी केले. उपचारानंतर तिची प्रकृती सुधारू लागल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आले; पण काही दिवसांमध्ये पुन्हा तिची प्रकृती खालावू लागल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल केले. त्या वेळी यकृताचे कार्य बंद झाल्याचे निदान झाले. त्यामुळे यकृत प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. 

याबाबत सह्याद्री रुग्णालयातील यकृत तज्ज्ञ डॉ. बिपीन विभूते, डॉ. प्रशांत राव आणि डॉ. मनीष पाठक यांनी जिवंतपणी यकृत प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया केली.
 

डॉ. राव म्हणाले, ""अक्‍यूट लीव्हर फेल्युअर हा विकार असणाऱ्या रुग्णांचे नाव प्रत्यारोपणासाठी नोंदवण्यात येते; परंतु "ब्रेन डेड‘ रुग्णांचे यकृत उपलब्ध झाले नाही. त्यामुळे तिचे प्राण वाचविण्यासाठी तिचे वडील पुढे आले. त्यांनी यकृतदान केले. आता ती मुलगी सामान्य जीवन जगत असून, तिला यकृत दान करणारे तिचे वडीलदेखील त्यांच्या कार्यालयात रुजू झाले आहेत.‘‘
 

पुण्याच्या "झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन कमिटी‘च्या (झेडटीसीसी) प्रमुख आरती गोखले म्हणाल्या, ""अवयव दानाविषयी समाजात अधिक जागृती झाल्यास "ब्रेन डेड‘ रुग्णांकडून येणाऱ्या अवयवांचे प्रमाण वाढेल व त्याचा रुग्णांना मोठ्या प्रमाणात उपयोग होईल.‘‘
 

या रुग्णाच्या केसमध्ये मुलीचे नाव अर्जंट कॅडावर लीव्हर ट्रान्सप्लांटसाठी नोंदवले होते व त्याचवेळी डॉक्‍टरांनी लाइव्ह डोनर लीव्हर ट्रान्सप्लांटचा पर्याय दिला होता. त्या वेळी मुलीच्या पालकांनी स्वत: पुढे येऊन यकृत दानाचा निर्णय घेतला; परंतु आईचे यकृत हे मुलीच्या यकृत प्रत्यारोपणासाठी योग्य नाही, हे डॉक्‍टरांच्या लक्षात आले. त्या मुलीच्या वडिलांचे यकृत प्रत्यारोपणसाठी सुस्थितीत होते. त्यामुळे ते प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमध्ये वापरण्यात आले.

Web Title: Liver donation saved the girl's life father