बेकरीतील केकमध्ये आढळली मेलेली पाल

रवींद्र जगधने
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

पिंपरी - निगडी प्राधिकरण येथील एमआरएफ बेकरीमधील केकमध्ये मेलेली पाल आढळून आली. ही घटना बुधवारी (ता. 12) बुधवारी घडली असून याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने बेकरीवर कारवाई करत बेकरी बंद केली आहे.

पिंपरी - निगडी प्राधिकरण येथील एमआरएफ बेकरीमधील केकमध्ये मेलेली पाल आढळून आली. ही घटना बुधवारी (ता. 12) बुधवारी घडली असून याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने बेकरीवर कारवाई करत बेकरी बंद केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी निगडीतील एका 33 वर्षीय महिलेने एमआरएफ बेकरीमधून चोको लावा नावाचा केक खरेदी केला होता. केक घरी आणल्यानंतर मायक्रोव्हेवमध्ये तो गरम करून बाहेर काढल्यानंतर त्यामधून दुर्गंधी येऊ लागली. महिलेने केकची व्यवस्थित पाहणी केली असता त्यामध्ये मेलेली पाल आढळून आली. त्यामुळे महिलेने निगडी पोलिस ठाण्यात धाव घेत पोलिसांत आणि अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली. तक्रारीची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने शनिवारी बेकरी बंद करण्याचे आदेश देत केक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला आहे.

Web Title: Lizard in Bakery Cake Crime