कर्जाच्या बहाण्याने तरुणाची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

पुणे - प्रधानमंत्री रोजगार निर्माण योजनेअंतर्गत व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने तरुणाची तिघांनी सव्वादोन लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना जानेवारी महिन्यात घडली. या प्रकरणी गुरुप्रसाद कानडे (वय २७, रा. बालाजीनगर, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

प्रधानमंत्री रोजगार निर्माण योजनेअंतर्गत व्यवसाय निर्मितीसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. कानडे यांना या योजनेअंतर्गत कर्ज मिळवून देण्यासाठी एका अज्ञाताने फोन केला. त्यासाठी वेळोवेळी ठराविक रकमेची मागणी केली. दरम्यान, तीन मोबाईलधारकांनी त्यांना वेगवेगळ्या बॅंक खात्यामध्ये सव्वादोन लाख रुपये भरण्यास सांगितले. प्रत्यक्षात कर्ज प्रकरण मंजूर केले नाही. 

Web Title: loan issue youth Fraud