पिंपळे निलख पोलिस चौकी सुरु करण्याची स्थानिकांची मागणी

मिलिंद संधान
शुक्रवार, 20 जुलै 2018

नवी सांगवी (पुणे) : पिंपळे निलख मधील वाढत्या गुन्हेगारीचा विचार करता तेथे पोलिस चौकी सुरु करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. मागिल काही दिवसांपासून निलख मध्ये रात्रीच्या वेळी वाहनांच्या जाळपोळ व फोडाफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने भयभीत झालेल्या स्थानिकांनी ' सकाळ ' च्या माध्यमातून आपल्या व्यथा मांडल्या आहेत.

येथील स्थानिक नगरसेवक तुषार कामठे यांनीही याबाबत पालकमंत्री गिरीष बापट यांना मार्च महिन्यात पत्राद्वारे स्थानिकांची व्यथा मांडली होती. त्यानंतर मे महिना व आता जुलै महिन्यात दोन स्मरण पत्रेही देऊन त्या प्रती पुणे पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त परिमंडळ - 3, सहायक पोलिस आयुक्त चतुःश्रुंगी विभाग व सांगवी पोलिस ठाण्यात येथे दिल्या आहेत.

नगरसेवक कामठे म्हणाले, "पिंपळे निलख परिसरात घरफोडी, वाहनांची तोडफोड व टवाळखोरांचा धुडगुस वाढला आहे. रात्री अपरात्री येथील नागरिकांना पोलिसात तक्रार द्यावयाची झाल्यास सांगवी पोलिस ठाणे गाठावे लागते. त्यामुळे सामाजिक शांतता प्रस्थापित होण्यासाठी येथे पोलिस चौकीची नितांत गरज आहे.

Web Title: Local demand for Pimpale Nilkh Police Chawki