पुणे-मुंबई लोकल ठरणार "सुखदायिनी' 

पुणे-मुंबई लोकल ठरणार "सुखदायिनी' 

पिंपरी - पुणे ते मुंबई दरम्यान प्रस्तावित असणारी लोकलसेवा प्रवाशांसाठी निश्‍चित सोईची ठरणार असून, त्यामुळे मुंबापुरीचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. या मार्गावर सध्या धावणाऱ्या मेल आणि एक्‍स्प्रेस गाड्यांवरील प्रवाशांचा ताण या लोकलमुळे कमी होणार आहे. येत्या काही दिवसांत लोकलसेवेची चाचणी घेण्यात येणार आहे. 

सध्या पुणे ते मुंबई मार्गावर धावणाऱ्या एक्‍स्प्रेस गाड्यांना प्रवाशांची कायमच गर्दी असते. दक्षिणेकडून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या प्रवाशांनी भरलेल्या असतात. मेल आणि एक्‍स्प्रेस गाड्यांना आकारण्यात येणाऱ्या तिकिटापेक्षा लोकलचे तिकीटही कमी असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना ही सेवा परवडणार आहे. 

लोहमार्गावरचा ताण वाढणार 
पुणे ते लोणावळा लोहमार्गादरम्यान सध्या दोन लाइन उपलब्ध आहेत. या मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांचे भारमान शंभरवरून 140 टक्‍क्‍यांपर्यंत जाऊन पोचले आहे. लोकलसेवा सुरू झाल्यानंतर सध्याच्या भारमानात वाढ होऊ शकते, त्यामुळे पुणे ते लोणावळा या दरम्यान उपनगरीय रेल्वेसाठी प्रस्तावित असणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचे काम लवकर सुरू होणे अपेक्षित आहे. 

प्रवास जलद होणार 
पुण्याहून मुंबईला सकाळी जाणाऱ्या गाड्यांची संख्या अधिक आहे, त्यामुळे प्रस्तावित लोकलसेवा ही पुण्याहून दुपारी आणि सायंकाळी चालविल्यास ती प्रवाशांना उपयुक्‍त ठरणार आहे. रेल्वेने पुणे ते लोणावळा मार्गावर ऑटोमॅटिक सिग्नल यंत्रणा बसविण्याचे काम हाती घेतले असून, देहूरोडपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. येत्या जूनपर्यंत उर्वरित काम पूर्ण होणार आहे, त्यामुळे लोकलचा प्रवास जलद होण्यास मदत होणार आहे. 

""पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व गाड्या शहरातील स्टेशनवर थांबत नाहीत. त्यामुळे या गाडीने जाण्यासाठी अनेकांना पुणे गाठावे लागते. लोकलच्या प्रवासात वेळ खर्च होणार असला, तरी या मार्गावरील सर्व स्टेशनवर ही गाडी थांबणार असल्याने प्रवाशांसाठी ते उपयुक्‍त ठरणार आहे. सध्या सिंहगड आणि सह्याद्री एक्‍स्प्रेस पिंपरी आणि चिंचवड स्टेशनवर थांबतात, त्यामुळे शहराच्या अन्य भागातून मुंबईला जाणाऱ्या सामान्य प्रवाशांची गैरसोय होते. लोकलसेवा सुरू झाल्यानंतर हा प्रश्‍न सुटणार आहे.'' 
- गुलामअली भालदार, अध्यक्ष, चिंचवड प्रवासी संघटना 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com