पुण्यातील प्रसिध्द जुना बाजाराचे होणार स्थलांतर; व्यापाऱ्यांचा विरोध 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

पुणे : जुना बाजार स्थलांतराला स्थानिक व्यापाऱ्यांनी विरोध करून महापालिका आणि पोलिसांच्या विरोधात आंदोलन करण्यास प्रारंभ केला आहे. 

पुणे : मंगळवार पेठ येथील रस्त्यावर भरणारा जुना बाजार आज बुधवारी बंद करण्यात आला आहे. जुना बाजार स्थलांतराला स्थानिक व्यापाऱ्यांनी विरोध करून महापालिका आणि पोलिसांच्या विरोधात आंदोलन करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे मोठा पोलिस बंदोबस्त तेथे तैनात करण्यात आला आहे. 

परिणामी, जुना बाजार रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली आहे. कसबा क्षेत्रीय कार्यालय, आरटीओ, मालधक्का येथपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.Juna Bazar Protest

शहरातील वाहतूकीची गंभीर परिस्थिती विचारात घेता, मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौक ते कुंभारवेस दरम्यान रस्त्यावर भरणारा जुना बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील महिनाभर प्रायोगिक तत्वावर हे आदेश देण्यात आले आहेत. 

मंगळवार पेठेतील जुना बाजार आठवड्यातील रविवार आणि बुधवारी भरतो. त्यामुळे रस्त्यावरच मोठी दुकाने थाटली जातात. तसेच, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे स्थानकाकडे जाणारा हा महत्वाचा रस्ता असल्याने याठिकाणी सातत्याने कोंडी होत होती. या पाश्वभूमीवर सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी हा बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील तीस दिवसांसाठी या आदेशाची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Local traders resist Juna Bazar migration