esakal | डुंबरवाडी टोलनाक्यावर स्थानिकाला मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

crime

ओतूर : डुंबरवाडी टोलनाक्यावर स्थानिकाला मारहाण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ओतूर : डुंबरवाडी (ता. जुन्नर) येथील टोलनाका व्यवस्थापकाने आळेफाटा येथील तरुणाला मारहाण केल्याने काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी शुभम फापाळे या तरुणाच्या फिर्यादीवरून व्यवस्थापक सचिन देवकर याच्या विरुद्ध ओतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: पुणे : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नागरीकांची गर्दी

याबाबत माहिती अशी, नगर- कल्याण महामार्गावर जुन्नर तालुका हद्दीत डुंबरवाडी येथे टोलनाका आहे. या टोलनाक्यावरून जुन्नर तालुक्यातील नागरिकांना ओतूर मार्केटला यावे लागते. या टोलनाक्यावर यापूर्वी स्थानिकांना आधारकार्ड पाहून सोडले जात असे. गुरुवारी (ता.९) रात्री ८. ३० वाजता आळेफाटा येथील शुभम फापाळे हा तरुण मालवाहतूक गाडी घेऊन आळेफाट्यावरून ओतूरकडे जात होता. डुंबरवाडी येथील टोलनाक्यावर आल्यानंतर येथील व्यवस्थापक सचिन देवकर याने गाडी थांबवली व आधारकार्डची मागणी केली. आधारकार्ड पाहिल्यानंतर पुन्हा गाडीचे आरसी बुकची मागणी केली, मात्र फापाळे यांच्याकडे आरसी बुक नसल्याने टोलनाका कर्मचारी व फापाळे यांच्यात वाद झाला. यावेळी फापाळे याने आपल्या मोबाईल मध्ये सदर शूटिंग चालू केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांना मारहाण करून मोबाईल हिसकावून घेऊन खाली आपटला.

हेही वाचा: शाळाविना असलेल्या शिक्षकांना समुपदेशनाने देणार नियुक्त्या

या घटनेची माहिती माहिती मिळताच पुणे जिल्हा मनसे उपाध्यक्ष मकरंद पाटे हे कार्यकर्त्यांसोबत टोलनाक्यावर आले. दरम्यान, ओतूर पोलिसदेखील टोलनाक्यावर पोहचले. उपस्थित तरुण व्यवस्थापक देवकर याला जाब विचारत होते. त्यामुळे काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सचिन देवकर याने आपली चूक झाल्याचे कबूल केले व यापुढे असा प्रकार होणार नसल्याचे सांगितले.

loading image
go to top