esakal | लॉकडाउन ठरला त्याच्या जिवनाचा टर्नींक पॉईंट; कसा ते वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

Book-Publish

लॉकडाऊनच्या काळात मोबाईलवर आलेले मेसेजरूपी सुंदर सुविचार आणि विचारांचा पगडा मनावर बसला आणि जिवन बदलुन गेले. इतरांनाही ते मार्गदर्शक ठरेल यासाठी त्यांनी त्याच पुस्तक बनवल आणि लॉक डाऊनचं देणं अस नाव देउन आपल्या मित्र परिवाराला दिल.

लॉकडाउन ठरला त्याच्या जिवनाचा टर्नींक पॉईंट; कसा ते वाचा

sakal_logo
By
चिंतामणी क्षीरसागर

वडगाव निंबाळकर - लॉकडाऊनच्या काळात मोबाईलवर आलेले मेसेजरूपी सुंदर सुविचार आणि विचारांचा पगडा मनावर बसला आणि जिवन बदलुन गेले. इतरांनाही ते मार्गदर्शक ठरेल यासाठी त्यांनी त्याच पुस्तक बनवल आणि लॉक डाऊनचं देणं अस नाव देउन आपल्या मित्र परिवाराला दिल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

होळ (ता. बारामती) येथिल तलाठी कार्यालयात कोतवाल असलेल्या बाळासो कर्चे यांचे हे कार्य परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे. व्यसनाच्या विळख्यात सापडलेल्या कर्चेंसाठी लॉक डाऊन एक टर्निग पॉईंट ठरला आहे.

लेखन वाचनाचा फारसा संबध नाही. घरबसल्या मोबाईल मित्र बनला. यावर आलेले विविध मेसेज कर्चेंना भावले, त्या प्रमाणे आचरनात आनण्याचा त्यांनी प्रयत्न केला. चांगल्या विचारांचे मेसेज त्यांनी लिहुन ठेवायला सुरूवात केली.

कोरोना हा उपचाराविना बरा होणारा किरकोळ आजार; झेडपी सभापतींनी सांगितला स्वत:चा अनुभव​

मार्मीक भाषेतील विनोदी आणि धार्मिक विचाराचे छोटे चुटके आपल्या मित्रांना दाखवले. संग्रह केलेले मेसेज मी लिहिले नाहीत पण हेच पुस्तक स्वरूपात केले तर... याबाबत त्यांनी जानकारांचा सल्ला घेतला आपल्या जिवनात परिवर्तन घडले इतरांना चांगले विचार मिळतील या भावनेतून मी लॉक डाऊनचं देणं हे पुस्तक बनवल ज्या मेसेज मध्ये लेखकाचे नाव आहे. ते त्यांनी जसेच्या तसे छापले आहे. पण ज्यांचे नाव नाही याबाबत प्रस्तावणेत खुलासा करून दिलगीरी व्यक्त केली आहे. नुकताच पुस्तक प्रकाशनाचा एक छोटेखानी कार्यक्रमही पार पडला. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सागर वायाळ, शुभम गायकवाड, विकास घाडगे, शंकर भंडलकर यांनी उपस्थित राहुन या आगळ्या वेगळ्या कार्याची प्रशंसा केली.

Edited By - Prashant Patil