‘पाण्यासाठी बाहेर पडावेच लागते’

सटवाईवाडी (ता. मावळ) - सह्याद्रीच्या कडेपठारावर विहिरीतून डोक्यावर पाणी घेऊन जाणाऱ्या महिला.
सटवाईवाडी (ता. मावळ) - सह्याद्रीच्या कडेपठारावर विहिरीतून डोक्यावर पाणी घेऊन जाणाऱ्या महिला.

कामशेत - दादा, लॉकडाऊन करून घरात बसले तर, गुरा-ढोरांना कोण पाणी पाजेल, डोक्यावर हंडा घेऊन बाहेर नाही गेले तर, आम्हाला प्यायला पाणी कसं मिळेल. आम्हाला पण वाटतं घरात बसावं, तरीही जमेल तेवढे आम्ही घरात बसतो. पण, पाण्यासाठी आम्हाला विहीरीवर जावे लागते.

आमचा नाईलाज आहे, धनगर पाड्यावरील संगीता आखाडे सांगत होती. वनिता शेडगे, नकाबाई खरात, सारिका हिरवे, अंजना ठिकडे याही मनमोकळेपणाने बोलत होत्या. आज घरात बसून राहिले तर, उद्या काय खायचे म्हणून थोडा वेळ का होईना शेतात जाऊन राबतो. आम्हाला वाटतं कोरोना दूर पळून जावा. एरवी निसर्गाशी दोन हात करून सह्याद्रीच्या कडेपाठरावर राहणाऱ्या लेकी-सूना आज हवालदिल झाल्या आहेत. कोरोनाची भीती त्यांच्या पर्यंत पोचली असली, तरी त्याची तीव्रता त्यांना ठाऊक नाही. मोबाईलला नेटवर्क असले तर जगाशी संपर्क. याही परिस्थितीत त्या कोरोनाची दक्षता घेत आहेत.

कोरोनाच्या प्रतिबंधक उपायासाठीच सोशल डिस्टनिंग त्यांना उमगले आहे. मुलांना साबणाने हात धुण्याचे धडे देत आहे. तोंडाला रुमाल बांधत आहेत. मात्र, पाण्यासाठी त्यांना डोक्यावर हंडा घेऊन जावेतलागत आहेत. सह्याद्रीच्या कडेपठारवर धनगर पाड्यात, डोंगरवाडी, सटवाईवाडी, ढोंगेवाडी, गोंटेवाडी येथे विहिरी आहेत. काही विहीरी एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे, तर काही ठिकाणी हातपंपावरून पाणी आणावे लागते. मोरमारेवाडीत पाण्याच्या टाकी भोवतीच बायकांचा पाणी भरायला गराडा असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com