पुण्यात सगळीकडे कडक बंदोबस्त होता पण खडकीत मात्र...

khadaki.jpg
khadaki.jpg

खडकी बाजार (पुणे) : संपूर्ण पुणे शहरासह पिंपरी चिंचवड, पुणे जिल्ह्यात १३ जुलै रात्री १२ वाजल्यापासून  कडक लॉकडाउन सुरू आहे. मात्र, खडकीत उलट चित्र सोमवारी सकाळ पासूनच पहावयला मिळाले. खडकी बाजार परिसरात पेट्रोल पंपासमोर पोलिसांचा तंबू आहे. मात्र, एकही पोलिस नाही, तर जागोजागी लहान मुले विना मास्क घोळक्याने क्रिकेट खेळताना दिसत आहेत. जागोजागी दुचाकीवरून दोन ते तीन जण फिरताना दिसत आहेत. तर दुकानांच्या खाली तीन चार जणांचा घोळका गप्पा मारत बसलेले दिसत आहे. त्यामुळे पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे खडकीत नागरिकांनी लॉकडाउनला हरताळ फासल्यामुळे लॉकडाउनचा फज्जा उडाला आहे.                   

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खडकी बाजारात सकाळी अकरा वाजता पेट्रोल पंपासमोर पोलिसांच्या तंबूमध्ये पोलिस हजर नव्हते. तर कॉसमॉस बँक व मेडिकल समोर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, मुख्य कपडा बाजार मधील दुकानाच्या बाहेर असलेल्या ओट्यांवर तीन ते चार जणांचे घोळके जागोजागी दिसत होते. दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान कसाई मोहोल्ला, इंदिरा कल्याण केंद्र समोर यु पी बेकरी परिसरात तब्बल पन्नास ते साठ लहान मुले हातात बॅट बॉल घेऊन क्रिकेट खेळताना दिसत होती.

स्थानिक रहिवाशी त्यांना खेळण्यास प्रतिबंध करीत होते. मात्र, त्यांना न जुमानता क्रिकेट सुरूच होते व त्या मुलांपैकी एका ही मुलाने मास्क वापरलेला दिसत नव्हता. असेच काही चित्र गाडी अड्डा, पाथरकर चाळ येथे पहावयास मिळत होते.  मात्र दिवसभर खडकीत पोलिसांचे दर्शन झाले नाही. खडकीत लॉकडाउन आहे की नाही असा प्रश्न खडकीतील काही नागरिक करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com