‘तुम्ही फक्त शटर वाजवा आम्ही आतमध्येच आहोत’

अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिकांना सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.
Lockdown
LockdownSakal

खेड-शिवापूर - ‘तुम्ही फक्त शटर वाजवा आम्ही आतमध्येच आहोत’ अशी परिस्थिती सध्या खेड-शिवापूर (Khed Shivapur) परिसरात सुरू आहे. येथील अनेक व्यावसायिक (Businessman) पोलिसांना (Police) न जुमानता सकाळी अकरानंतरही दुकाने (Shop) सुरू ठेवत आहेत. याबाबत पोलिसांना (Police) पत्र देऊनही संबंधित दुकानदारांवर कारवाई (Crime) होत नाही, असे प्रशासनाचे (Administrative) म्हणणे आहे. (Lockdown Shutter Shop Police Shopkeeper Crime Khed Shivapur)

अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिकांना सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र, पुणे-सातारा रस्त्यावर खेड-शिवापूर (ता.हवेली) आणि वेळू (ता.भोर) परिसरातील अत्यावश्यक सेवेतील अनेक विक्रेते सकाळी अकरा नंतरही दुकाने सुरू ठेवतात. विशेष म्हणजे हे दुकानदार पोलिसांनाही जुमानत नाहीत. कोंढणपूर फाट्यावर भाजी विक्रेते, मोबाईल दुकानदार, दूध विक्रेते तर वेळू फाट्यावर दूध विक्रेते, किराणा दुकानदार, बेकरी व्यावसायिक, चिकन विक्रेते सकाळी अकरानंतर चोरून दुकाने सुरू असल्याचे दिसून येत आहे. ही दुकाने चोरून अकरा नंतरही सुरू असल्याने विविध साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिक सकाळी अकरानंतरही बाहेर पडत आहे. यावरून कोरोनाच्या भयानक परिस्थितीचे या परिसरात गांभीर्य राहिले नसल्याचे स्पष्ट होत आहे.

Lockdown
लोणावळा: वेब सिरीज पाहून लुटण्याची लढवली शक्कल

याशिवाय सोशल डिस्टन्सिंग, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना याचे हे दुकानदार पालन करत नाहीत. शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या या दुकानदारांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली जात आहे.

सकाळी अकरानंतर जे व्यावसायिक दुकाने सुरू ठेवत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही पोलिसांना पत्र दिले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना बोलविले तरी पोलिस येत नाहीत.

- विजयकुमार गरुड, ग्रामसेवक, श्रीरामनगर

कारवाईबाबत प्रशासनाचे आम्हाला पत्र मिळालेले नाही. मात्र पोलिस प्रत्येक गावात जाऊन कारवाई करत आहेत.

- निखिल मगदूम, फौजदार, राजगड पोलिस ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com