लोहगावकरांना पाणी 25 पैसे लिटर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

येरवडा - पुणे महापालिका लवकरच समान पाणीपुरवठा करणार आहे. शहरात सर्वत्र पाणीमीटर बंधनकारक करण्यात येणार आहे. मात्र नव्याने समाविष्ट झालेल्या लोहगावमध्ये आठवड्याला एकदाच पिण्याचे पाणी मिळत असून, लोहगाव पंपिंग स्टेशनवर सकाळी सहापासून रात्री उशिरापर्यंत २५ पैसे प्रतिलिटरप्रमाणे पिण्याचे पाणी घेण्यासाठी लोहगावकरांची गर्दी असते. 

लोहगावात प्रवेश करताच जागतिक पाणीपुरवठा प्रकल्पाचे पंपिंग स्टेशन आहे. या पंपिंग स्टेशनवरून लोहगाव, साठे वस्ती, खांदवेनगर, संतनगर, हरणतळे, खंडोबाचा मळा या परिसरात वेळापत्रकाप्रमाणे आठवड्यातून एकदा पाणी सोडले जाते. मात्र हे पाणी लोहगावकरांना पुरेसे नाही. त्यामुळे ते या पंपिंग स्टेशनवर बसविण्यात आलेल्या कॉइन मशिनमध्ये पाच रुपये टाकून वीस लिटर पाणी भरतात. या ठिकाणी पाणी भरण्यासाठी सकाळी सहापासून रात्री उशिरापर्यंत लोहगावकरांना पाणी भरावे लागते. महापालिकेच्या हद्दीत इतरांना मुबलक व पुरेशा दाबाने पाणी, तर येथे पैसे का, असा प्रश्‍न येथील नागरिक उपस्थित करीत आहेत. या संदर्भात व्हॉल्वमन अनिल कराळे म्हणाले, ‘‘लोहगाव ग्रामपंचायत असल्यापासून पंपिंग स्टेशनवर दररोज दीडशे ते दोनशे नागरिक पाणी भरण्यासाठी येतात.’’

पाण्याची विक्री
खांदवेनगर येथे महापालिकेच्या वतीने टॅंकरने मोफत पाणीपुरवठा केला जातो. मात्र येथील काही जण या पाण्याची विक्री करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संदर्भात बंडगार्डन पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता दत्तात्रय तांबारे म्हणाले, ‘‘नगरसेवकांच्या सांगण्यावरून खांदवेनगरमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. मात्र तेथील भाडेकरूंची संख्या पाहता पाण्याची विक्री होत असल्याची शक्‍यता आहे.

पठारे वस्तीला पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे पाणी विकत घ्यावे लागते. तसेच पाण्यासाठी वस्तीपासून लोहगाव पंपिंग स्टेशनपर्यंत भर उन्हाळ्यातच पायपीट करावी लागते. याचा त्रास परिसरातील सर्व महिलांना होतो. 
-भारती सावंत, गृहिणी

Web Title: Lohagankar water for 25 paisa liter