लोहगाव विमानतळावर सुरक्षकांचा खडा पहारा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरातील विविध शहरांत हाय ॲलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे लोहगाव विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. तसेच विमानतळावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांची तपासणी काटेकोरपणे केली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी विमान उड्डाणाच्या तीन तास आधी विमानतळावर दाखल व्हावे, असे आवाहन विमानतळ प्रशासनाने केले आहे.

पुणे - स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरातील विविध शहरांत हाय ॲलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे लोहगाव विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. तसेच विमानतळावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांची तपासणी काटेकोरपणे केली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी विमान उड्डाणाच्या तीन तास आधी विमानतळावर दाखल व्हावे, असे आवाहन विमानतळ प्रशासनाने केले आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘ब्यूरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्‍युरिटी’ने (बीसीएएस) देशभरातील सर्व विमानतळांना हाय अलर्ट दिला असून, ही सुरक्षा व्यवस्था या महिनाअखेरपर्यंत (३१ ऑगस्ट) कायम राहणार आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलांना सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच विमानतळावरील सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याचा आदेश विमानतळ प्रशासनाला देण्यात आला आहे.

रेल्वे गाड्या रद्द होऊनही तिकीट आरक्षण निश्‍चित
कर्जत ते लोणावळा घाट भागात गेल्या काही दिवसांपासून सतत दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे हा रेल्वेमार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. तसेच पावसामुळे राज्यातील अनेक भागांतील लांब पल्ल्यांच्या गाड्याही रद्द केल्या आहेत. मात्र, रेल्वेने रद्द केलेल्या गाड्यांचे आरक्षण निश्‍चित झाल्याचे संदेश प्रवाशांना येत
आहेत. त्यामुळे प्रवासी संभ्रमावस्थेत आहेत.

रेल्वे प्रशासनाने रद्द केलेल्या गाड्या आणि रेल्वेचे ऑनलाइन तिकीट हे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनची (आयआरसीटीसी) संकेतस्थळावरील माहिती यांच्यात तफावत दिसून येत आहे. तसेच आयआरसीटीसीकडून रद्द झालेल्या गाड्यांचे आरक्षण निश्‍चित झाल्याचे संदेश प्रवाशांना येत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lohgaon Airport Security Railway Ticket Reservation