
Ajit Pawar on Assembly Election : लोकसभा अन् विधानसभा निवडणुका एकत्र लागणार; अजित पवारांचं भाकीत
पुणे : राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी होतील असं भाकीत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केलं आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं. राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील का या प्रश्नावर बोलताना त्यांनी हे भाकीत केलं. (Loksabha and Assembly Elections would happened at same time saya Ajit pawar)
अजित पवार म्हणाले, "मला असं वाटतं, लोकसभेच्या बरोबर मध्यावधी विधानसभेची निवडणूक घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी १९९९ साली अशा प्रकारे निवडणूक झाली होती. या काळात सहा महिने बाकी असताना निवडणुका घेतल्या आणि लोकांनी लोकसभा आणि विधानसभेसाठी एकत्र मतदान केलं होतं"
मध्यावधी निवडणुका लागतील - उद्धव ठाकरे
दरम्यान, काल चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील असं भाष्य केलं होतं. त्यावर आज दिवसभर राजकीय चर्चा झडल्या होत्या.
शरद पवारांनीही केलं भाष्य
उद्धव ठाकरेंच्या या विधानावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं की, त्यांनी हे विधान कशाच्या आधारे केलं हे माहिती नाही. पण सध्यातरी राज्यात तशी परिस्थिती नाही. यावरुन त्यांनी एक प्रकारे मध्यावधी निवडणुकीची शक्यता फेटाळून लावली.