पुण्याची लोकसभेची जागा काँग्रेसची - अनंत गाडगीळ 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

पुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढविली जाईल, असे जाहीर वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर, पुणे लोकसभेची जागा काँग्रेस पक्ष लढवेल, असे काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अनंत गाडगीळ यांनी आज स्पष्ट केले. 

‘‘गेल्या लोकसभा निवडणुकीत पुण्यात काँग्रेसचा उमेदवार साडेतीन लाखांच्या फरकाने पराभूत झाला; परंतु केंद्र सरकार गेल्या चार वर्षांमध्ये सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि समविचारी पक्षांची एकत्र येऊन निवडणूक लढविली पाहिजे. पुणे लोकसभा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे भविष्यातदेखील पुणे लोकसभेची जागा काँग्रेस पक्षच लढवेल. उमेदवार कोण असेल याबाबत आताच बोलणे योग्य होणार नाही. पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील त्याला निवडून आणण्यासाठी सर्व जण प्रयत्न करू.’’

Web Title: Lok Sabha seat in Pune says Anant Gadgil