टिळक-आगरकरांचे मैत्रीगीत (व्हिडिओ) 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

टिळक पुण्यतिथीनिमित्त डॉ. आशुतोष जावडेकर यांनी लिहिलेले आणि संगीतबद्ध केलेले "दोघे' हे गीत आज सर्व रसिकांपर्यंत पोचते आहे. 

लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर.. कॉलेजच्या दिवसांतली त्यांची भटकंती, डेक्कन कॉलेजच्या मागची टेकडी तुडविताना मारलेल्या गप्पा आणि देशसेवेचं दोघांनी घेतलेलं व्रत... दोघांनी चालविलेली शाळा-कॉलेज.. एकत्र भोगलेला तुरुंगवास.. आणि मग झालेली भांडणे, वाद, टोकाचे वाद, एकमेकांवर अग्रलेखांमधून केलेले वार.. वैचारिक मतभेत ते व्यक्तिगत दुरावा... पण मग आगरकरांची ढासळलेली प्रकृती, दोघांची शेवटची हृदय आणि अपुरी भेट...

टिळक पुण्यतिथीनिमित्त डॉ. आशुतोष जावडेकर यांनी लिहिलेले आणि संगीतबद्ध केलेले "दोघे' हे गीत आज सर्व रसिकांपर्यंत पोचते आहे. आज (बुधवार, ता. 1) सकाळी साडेदहा वाजता "सकाळ'च्या फेसबुक पेजवर हे गीत रीलिज करण्यात आले. 

Web Title: Lokmanya Tilak and Gopal Ganesh Agarkar friendship

व्हिडीओ गॅलरी