Loksabha 2019 : कोऱ्या पाटीवर नवा अध्याय

Politics
Politics

पुणे - पुणे शहराचा पुढील पंचवीस वर्षांचा विकास डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून गेल्या लोकसभा निवडणुकीत जाहीरनाम्याच्या माध्यमातून भरघोस आश्‍वासने दिली गेली. मात्र, त्या निवडणुकीत पक्षाला दारूण पराभव पत्कारावा लागला; परंतु शहरातील एक सक्षम विरोधक म्हणून सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारान दिलेली आश्‍वासने पूर्ण करून घेण्यातही हा पक्ष मागे पडला. या निवडणुकीत आता नवा उमेदवार, नवा जाहीरनामा घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार रिंगणात उतरेल.

पुणे शहर हे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. महापालिकादेखील या पक्षाच्या ताब्यात होती. शहराच्या विकासात काँग्रेसचे योगदान मोठे आहे. परंतु, गेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला फटका बसला. लोकसभेसह महापालिका निवडणुकीत पक्षाची पिछेहाट झाली. पक्षाला विरोधकांच्या रांगेत बसावे लागले. एक सक्षम विरोधक म्हणून सत्ताधारी भाजपवर पक्ष वचक ठेवेल, असे अपेक्षित होते; परंतु गटबाजीच्या विळख्यात अडकलेल्या काँग्रेसला सक्षम विरोधक म्हणूनदेखील पर्याय उभा करता आला नाही. भाजपकडून लोकसभा निवडणुकीमध्ये जाहीरनाम्यात भरघोस आश्‍वासन देण्यात आली. या आश्‍वासनांची पूर्तता करून घेण्याची जबाबदारी काँग्रेसवर होती. परंतु त्यात त्यांना फारसे यश आले नाही.

आश्‍वासन पूर्ततेसाठी पाठपुरावा
दिलेली आश्‍वासने आणि त्यांच्या पूर्ततेसाठी काँग्रेसने केलेल्या प्रयत्नांबद्दल शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, ‘‘दिलेल्या आश्‍वासनांबद्दल काँग्रेस जागरूक आहे. काँग्रेस सत्तेत नसल्यामुळे त्यांची पूर्तता करण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडे पाठपुरावा केला आहे. त्यासाठी आंदोलने करतानाच विधी मंडळात आणि संसदेत पक्षाच्या सदस्यांनी आवाज उठविला आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com