Loksabha 2019 : निवडणुकीचा चढतोय रंग

Politics
Politics

पिंपरी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप, शिवसेना या पक्षांच्या मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघांतील बैठका सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी साधलेला संवाद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची सोमवारी (ता. १८) पुण्यात होणारी संयुक्त बैठक यामुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे.

राष्ट्रवादीने शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे व मावळातून पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला होता. अजित पवार यांनी राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. दरम्यान, भाजप-शिवसेना युतीतर्फे रविवारी सायंकाळपर्यंत मावळ व शिरूरमधील उमेदवारांची नावे जाहीर झालेली नव्हती. मात्र, विद्यमान खासदार श्रीरंग बारणे व शिरूरचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी कार्यकर्त्यांसह मतदारांशी संपर्क साधायला सुरवात केली आहे. शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी थेरगावमध्ये झाला. 

पक्ष नियोजन करेल, त्या पद्धतीने भविष्यात निवडणुकीचे काम केले जाईल. त्यासाठी पक्षश्रेष्ठी ठरवतील त्यानुसार नेत्यांच्या सभा आयोजित केल्या जातील.
- लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष, भारतीय जनता पक्ष

भाजप-शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक सोमवारी पुण्यात होणार आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. 
- गजानन चिंचवडे, जिल्हाप्रमुख शिवसेना

पक्ष कार्यकर्त्यांची बैठक झाली आहे. एक-दोन दिवसांत काँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक होईल. त्यानंतर मोठ्या सभा आयोजित केल्या जातील.
- सचिन साठे, शहराध्यक्ष काँग्रेस

रविवारी दिवसभर कार्यकर्त्यांशी संपर्क साधून वाल्हेकरवाडीत आयोजित सभेचे नियोजन केले. आजच्या सभेत पक्षश्रेष्ठी सांगतील त्यापद्धतीने प्रचाराचे नियोजन केले जाईल.
- संजोग वाघेरे, शहराध्यक्ष राष्ट्रवादी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com