व्हीव्हीपॅटच्या ताळमेळीचे पोलिंग एजंटांपुढे आव्हान

VVPat-Machine
VVPat-Machine

पुणे - भाजप, काँग्रेससह इतर राजकीय पक्षांनी मतमोजणीसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांची यंत्रणा सज्ज केली आहे. या वेळी व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएममधील मतांची मोजणी केली जाणार असल्याने त्याचा ताळमेळ घालण्याचे व व्यवस्थित लक्ष ठेवण्याचे आव्हान पोलिंग एजंटांपुढे राहणार आहे.

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता. २३) आहे. त्यासाठी प्रशासनासह राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील वडगाव शेरीमध्ये मतमोजणीचे २०, शिवाजीनगर १४, कोथरूड १८, पर्वती १६, पुणे कॅंटोन्मेंट १४ आणि कसबा मतदारसंघात १४ टेबल आहेत. त्या प्रत्येक टेबलनुसार राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाकडून या कार्यकर्त्यांना ओळखपत्रही देण्यात आले आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघांतील पाच व्हीव्हीपॅट मशिनमधील २५ मतांची मोजणी केली जाणार आहे. त्यासाठी खास सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक फेरीचे बूथनुसार मतदान घेण्यासाठी पोलिंग एजंटांकडे चार्ट देण्यात आला आहे. त्यामध्ये मतमोजणीची उमेदवारनिहाय माहिती भरून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे द्यावा लागणार आहे. 

भाजपने उमेदवार, उमेदवार प्रतिनिधी यांसह पोलिंग एजंट अशी एकूण ११५ जणांची टीम तयार केली आहे. त्यांना बुधवारी (ता. २२) जंगली महाराज रस्त्यावरील पक्ष कार्यालयात प्रशिक्षण दिले जाणार आहे, असे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सांगितले. 

काँग्रेस कार्यकर्त्यांना मतमोजणीच्या दिवशी काय खबरदारी घ्यावी, चार्टमध्ये माहिती कशी भरावी, याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले.

अनेकांचे अपक्षांमार्फत ओळखपत्र 
निवडणूक आयोगाकडून मतमोजणीच्या ठिकाणी मोजक्‍याच कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना प्रवेश दिला जातो. त्यामुळे प्रमुख पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारांशी संपर्क साधून त्यांचे प्रतिनिधी असल्याचे ओळखपत्र निवडणूक आयोगाकडून मिळविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com