Loksabha 2019 : शिरूरला हायटेक प्रचार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मार्च 2019

मंचर - शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे व शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील या दोन्ही उमेदवारांनी यू-ट्यूब, व्हॉट्‌सॲप, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम या आधुनिक तंत्रज्ञानाचा अत्यंत कौशल्याने वापर सुरू केला आहे. ‘हायटेक’ प्रचार यंत्रणेमुळे निवडणूक रंगतदार होणार आहे.

मतदारसंघातील भोसरी, हडपसर, आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर-हवेली या तालुक्‍यांत खास यंत्रणा उभारून हायटेक प्रचाराला सुरवात झाली आहे. दोन कंपन्यांची सिमकार्ड असणाऱ्या मतदारांची संख्या अधिक आहे. मतदारांकडे २५ लाखांहून अधिक मोबाईल असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

सर्व मतदारांचे मोबाईल क्रमांक पक्षांच्या हायटेक समितीने मिळविले आहेत. दररोजच्या सभा, पदयात्रा, गाठीभेटींचे चित्रीकरण करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, फूलस्क्रीन एलईडी व्हॅन असलेली टीम सोबत असते. ध्वनिमुद्रित केलेला उमेदवारांचा आवाज मोबाईलद्वारे ऐकविण्याची चाचणी पूर्णत्वास आली. चित्रफितीतील उमेदवारांचा आवाज व हावभाव मोबाईलद्वारे मतदारसंघात घुमणार.

तंत्रज्ञानाचा वापर करून मतदारांपर्यंत पोचविण्यासाठी दोन्ही उमेदवारांनी मोठी यंत्रणा उभी केली आहे. लहान मोठ्या व्हिडिओ स्टेट्‌सद्वारे दैनंदिन घडामोडींचा मागोवा घेतला जातो. पक्षाचे चिन्ह, उमेदवाराची माहिती, सभांचा वृत्तांत एसएमएस, ई-मेल, व्हॉटस्‌ॲप, ट्‌विटर, यू-ट्यूब, फोटो फिचर या यत्रणेचा वापर केला जातो.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Shirur Amol Kolhe Shivajirao Adhalrao Politics