शिरूर-हवेलीतील ‘राष्ट्रवादी’त नवचैतन्य

NCP
NCP

ॲड. अशोक पवार, प्रदीप कंद, मंगलदास बांदल या ‘त्रिमूर्ती’ने लढवला किल्ला
शिरूर - डॉ. अमोल कोल्हे यांच्या शिरूर मतदारसंघातील विजयाने आणि शिरूर विधानसभा मतदारसंघातून त्यांना मिळालेल्या घसघशीत मताधिक्‍याने शिरूर-हवेलीतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. २०१४ च्या विधानसभेनंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीतील विजयाची परंपरा या निवडणुकीपर्यंत कायम राखल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार बाबूराव पाचर्णे यांनी भाजपकडून विजय मिळवताना राष्ट्रवादीच्या अशोक पवार यांचा पराभव केला होता. मात्र त्यापाठोपाठ झालेल्या घोडगंगा साखर कारखाना, जिल्हा परिषद-पंचायत समिती, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती, शिरूर नगर परिषद व शिरूर खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’ने वरचष्मा राखला होता.

शिरूर विधानसभा मतदारसंघाने जुन्नर पाठोपाठ मताधिक्‍य राखताना, आंबेगावलाही मागे टाकले. आंबेगावातून डॉ. कोल्हे यांना २५ हजारांचे मताधिक्‍य असताना, शिरूरने तब्बल २६ हजार ३०५ मतांची आघाडी दिली. माजी आमदार ॲड. अशोक पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल या ‘त्रिमूर्ती’ने या घसघशीत मताधिक्‍यासाठी नेटाने किल्ला लढवला. काही अपवाद वगळता राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपापले गट ‘शाबूत’ ठेवल्याने डॉ. कोल्हे यांच्या मताधिक्‍याचा आलेख वरवर गेला. जिल्हा परिषद सदस्या सुजाता अशोक पवार यांच्या वडगाव रासाई-मांडवगण फराटा जिल्हा परिषद गटाने डॉ. कोल्हे यांना सात हजार ६३६ मतांची विक्रमी आघाडी दिली.

त्याखालोखाल रेखा बांदल यांच्या रांजणगाव सांडस-तळेगाव ढमढेरे गटाने सात हजार १६१ मतांची आघाडी दिली. आमदार पाचर्णे यांचे चिरंजीव राहुल यांचा पराभव करून निवडून आलेले राष्ट्रवादीचे राजेंद्र जगदाळे यांच्या शिरूर-न्हावरे गटाने दोन हजार ६८६ मतांची आघाडी दिली. मात्र शिरूर पंचायत समिती गणातून आढळराव यांना १४७ मते जास्त मिळाली. भाजपचे आबासाहेब सरोदे हे या गणाचे प्रतिनिधित्व करतात. शिक्रापूर-सणसवाडी या राष्ट्रवादीच्या कुसुम आबाराजे मांढरे यांच्या गटातून डॉ. कोल्हे यांना अवघी ६४७ मतांची आघाडी मिळाली. शिवाय सणसवाडी गणातून १४७ मतांनी पिछाडीवर जावे लागले. त्यांना शिरूर-हवेली मतदारसंघात शिरूरमधून तब्बल १८ हजार २२०; तर हवेलीतून आठ हजार ८५ मतांची आघाडी मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com